Death Threat To Sharad Pawar: मोठी बातमी: शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Sharad Pawar Gets Life Threat: खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Supriya Sule Meets Mumbai Police Commissioner: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'राजकारण महाराष्ट्राचं' नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

मला व्हा़ट्सअप वर हा मेसेज आालाय. ज्या पद्धतीने ही धमकी आली ती दुर्दैवी आहे. राज्यात दडपशाही आणि गुंडाराज सुरु आहे. धमकी देणारा भाजपचा (BJP) कार्यकर्ता आहे. जी धमकी आली आहे त्याच्या खाली त्याच पद्धतीने कमेंट्स करण्यात आल्या आहेत. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. याची सर्व जबाबदारी राज्यसरकारआणि गृहमंत्रालयाची आहेत. मी महिला आणि नागरिक म्हणून राज्याच्या गृहमंत्रालयाकडे न्याय मागत आहे. जर काही बरंवाईट झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकारची असेल. अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Sharad Pawar
Sunita Dhangar finally suspended : लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर निलंबित

डिसेंबर २०२२ मध्येही अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी फोन करुन पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसामुळे पक्षात उत्साहाचं वातावरण असताना त्यांना धमकी आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर धमकीचा फोन करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याचे सांगितले.

त्यापूर्वीही सप्टेंबर २०२२ मध्येही असाच धमकीचा फोन आला होता. त्या दिवशी त्यांना सोलापुरातील माढा तालुक्याच्या दौऱ्यावर जायंच होतं. पण, त्याच दिवशी सकाळी , कुर्डूवाडी दौऱ्यावर येऊ नका, अशा आशयाचा धमकीचा फोन आला होता. कोणत्याही परिस्थितीत दौऱ्यावर जाऊ नका, कुर्डूवाडी दौरा टाळा, अशी धमकीच त्यांना फोनवरुन देण्यात आली होती. पण धमकीला भीक घालतील ते पवार कसले. त्यांनी आपला नियोजित दौरा पूर्ण केला. आतापर्यंत अनेकदा शरद पवारांना अशा धमक्या आल्या. पण कोणत्याही धमकीला भीक न घालता त्यांनी काम सुरु ठेवले. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com