Lok Sabha Elections 2024 : विधानसभेच्या मध्यावधीबरोबरच लोकसभेची निवडणूक ?; परिस्थिती पाहून पंतप्रधान मोदींकडून...

Lok Sabha Elections in December : जर निवडणुकीत यश मिळत असेल तरच ..
PM Narendra  Modi
PM Narendra Modi Sarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी वर्षाअखेर म्हणजे डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासमेवत नुकतीच बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची निवडणूक घेतल्यास पक्षाची स्थिती कशी असेल, याबाबत मोदींनी चाचपणी केल्याची माहिती आहे.

मोदींनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आमि राजस्थान या तीन राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र घेण्याबाबत आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर निवडणुकीत यश मिळत असेल तरच निवडणूक लवकर घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे, नाहीतर निवडणूक वेळेत होतील अशी शक्यता आहे.

PM Narendra  Modi
BJP leaders Letter to Rahul Gandhi : राहुल गांधींच्या "मोहब्बत की दुकान' ला भाजपचं सडेतोड उत्तर ;'नफरस का मेगामॉल'..

अपेक्षीत निकाल न लागल्यास..

भाजपच्या विजयाची शंभर टक्के खात्री पटत नाही, तोपर्यंत एप्रिल २०२४च्या पूर्वी ते लोकसभा निवडणूक घेणार नाहीत, असे मोदींच्या निकटवर्तीय नेत्यांनी सांगितले. असे असले तरी मध्यप्रदेश, छत्तीसगड आमि राजस्थान या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत निकाल न लागल्यास लोकसभा निवडणुकीवर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून विधानसभेसोबतच लोकसभेची निवडणुकीत घ्यावी, असे भाजपमधील एका गटाचे मत आहे.

PM Narendra  Modi
Sunita Dhangar finally suspended : लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर निलंबित

आगामी लोकसभा जिंकायचीच या विश्वासाने कामाला लागलेल्या भाजपने महाराष्ट्रात मिशन 48 सुरु केले आहे. त्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजेच 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

भाजपने सर्वच मतदारसंघामध्ये निवडणूक प्रमुख जाहीर केल्याने एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. कारण भाजपने जर 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमले असतील तर मग शिंदे गटाला भाजप लोकसभेच्या जागा सोडणार की नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com