Jitendra Awhad - Chitra Wagh Tweet War: आव्हाड-चित्रा वाघ यांच्यात ट्विटर वॉर; 'बहिणीला सांभाळत आलो पण...'

Jitendra Awhad Tweet to Chitra Wagh: शिवीगाळ केल्याचा आव्हाडांवर आरोप..
Jitendra awhad Tweet to Chitra Wagh :
Jitendra awhad Tweet to Chitra Wagh : Sarkarnama

Jitendra Awhad Tweet to Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहे. भर पत्रकार परिषेदेत आव्हाड यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला गेला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आव्हाड यांचा मेंदूही स्वभावानुसार सडत चाललाय, अशी टीका वाघ यांनी केली. वाघांच्या याच टीकेवर आता आव्हाडांनी पलटलार केला आहे.

Jitendra awhad Tweet to Chitra Wagh :
Rahul Narevekar on Supreme Court: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी घेणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले...

जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले, "ताई मी कुठली ही शिवी दिलेली नाही. फक्त मला कोणाची तोंडं उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम में सब नंगे हैं. बापूआर्मस्ट्राँग आठवत असेल ना. यापुढे स्वभावाप्रमाणे वागीन. अँटी चेम्बरमधले विनोद आत्ता बस, असे म्हणत आव्हाडांनी चित्रा वाघांना सूचक इशारा दिला आहे.

Jitendra awhad Tweet to Chitra Wagh :
MLA Disqualification: आमदारांच्या अपात्रतेबाबत महत्त्वाची अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

"बहिणीलाआतापर्यंत सांभाळून घेत आलो.."

"आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता. पण माझा स्वभाव आपल्याला माहित आहे. मी सहन करतो, पण मला त्यांनीच बोलावे ज्यांचे हात स्वच्छ आहेत. अजून खूप बोलू शकतो. बहिणीला सांभाळून घेत आलो, पण…", असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यावर भाष्य केले आहे.

"आव्हाडांचा मेंदूही सडत चाललाय.."

चित्रा वाघ आव्हाडांवर बोचरी टीका केली होती. वाघ म्हणाल्या "यांची सत्ता काय गेली, सत्तेबरोबर यांची मतीही गेली. आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय..." असे ट्विट वाघ यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com