सावरकर वादावर जयराम रमेश यांचा राऊतांशी संवाद अन् मविआच्या भवितव्याबद्दल स्पष्टच बोलले...

Bharat Jodo Yatra : राऊत यांनी राहुल यांच्या वक्त्यवावर शिवसेना सहमत नाही याचा आघाडीवर परिणाम होऊ शकतो,असे म्हटले होते.
Jayram Ramesh, Bharat Jodo Yatra Latest News
Jayram Ramesh, Bharat Jodo Yatra Latest News Sarkarnama

शेगाव : सावरकर हा भारत जोडो यात्रेचा मुख्य मुद्दा नाही आणि त्याचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेसचे (Congress) नेते माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला. (Jayram Ramesh, Bharat Jodo Yatra Latest News )

Jayram Ramesh, Bharat Jodo Yatra Latest News
Rahul Gandhi vs Savarkar : राहुल गांधींच्या विरोधात शिंदे गट आक्रमक, दुसरी तक्रार दाखल

शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्त्यवावर शिवसेना सहमत नाही आणि आघाडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे म्हटले होते. त्यावर जयराम रमेश यांनी राऊत यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे सांगितले. यावर त्यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर महाविकास आघाडीवर याचा परिणाम होईल, असे आपल्याला वाटत नाही, असे रमेश यांनी स्पष्ट केले आहे.

Jayram Ramesh, Bharat Jodo Yatra Latest News
Bharat Jodo Yatra : 'सावरकर छोडो-भारत जोडो,' ; सावरकर मुद्यावर बोलण्यास जयराम रमेश यांची टाळाटाळ

आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे. गरिबी, रोजगार, राजकीय तानाशाही, दडपशाही हे आमचे मुद्दे आहेत. ही भारत जोडो यात्रा उत्तरेकडून दक्षणेकडे जात आहे. यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ते बघता पूर्व-पशिम् यात्रा काढली जाऊ शकते. मात्र आद्याप याचा निर्णय झाला नाही, असेही जयराम रमेश यांनी सांगितले. काँगेस पक्षालाही याचा फायदा होत आहे. पक्ष अधिक मजबूत आणि एकजूट होत आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केले.

Jayram Ramesh, Bharat Jodo Yatra Latest News
MNS : 'खळखट्याक' सुरु ; Rahul Gandhi यांची सभा उधळण्यासाठी आलेले मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी कार्यकर्तांसाठी दार उघडे करून दिले आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन यात्रेचे मुद्दे मांडत आहे आणि यात्रा संपल्यावरही हे काम ते करत राहणार. त्यासाठी सोशल मिडीयाचाही वापर मोठ्या प्रमाणावर करू, असे रमेश यांनी सांगितले. 2024 ची निवडणूक स्मार्ट फोन ची असेल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in