आदित्यच्या लग्नाची चंद्रकांतदादांना का झाली घाई? : खुद्द आदित्य ठाकरेंनी दिले हे उत्तर!

केंद्राला मदत मागण्याच्या मुद्यावरून टीका करताना आदित्यच्या लग्नाचा मुद्दा...
aditya-Chandrakantdada
aditya-Chandrakantdada

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता आदित्य ठाकरे यांच्या लग्नासाठीही केंद्राकडे प्रयत्न करावेत, अशी खोचक टीका भाजपचे नेते तरत असतात. आदित्यसाठी मुलगी बघा, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवायचे मुख्यमंत्री बाकी राहिले आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही केली.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी थेट उत्तर दिले असून माझ्या लग्नाची इतकी काय घाई आहे? त्यावर मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलेन. आता वातावरण चांगले ठेवावे. सध्या राजकारण नको, असे मत व्यक्त केले आहे. (Aditya Thackeray replies to Chandrakant Patil)

राज्य सरकार हे प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा मुद्दा उपस्थित करताना आता आदित्यच्या लग्नाचेच केंद्राला विचारायचे बाकी ठेवले आहे, अशी टीका भाजपचे नेते करत असतात. त्याला आदित्य यांनी उत्तर दिले आहे. माझ्या लग्नाची आताच घाई कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत यावर अधिक बोलण्याचे टाळले. ते म्हणाले, ``सध्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री  चांगला संवाद ठेवत आहेत. त्यामुळे विनाकरण वेगळे राजकरण नको, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची निवडणूक दोन वर्षे पुढे ढकलण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली होती. त्यावर आदित्य यांनी आपण त्या विषयावर माहिती घेतली नसल्याचे सांगितले. मुंबई महानगर प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक आर. ए. राजीव यांना मुदतावढ देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांची बदली झाली. मुंबई मेट्रोचे काम वेगाने आणि सुरळीत ठेवण्यात त्यांना यश आल्याने त्यांची बदली टळणार असल्याचे सांगण्यात येत होते. या बदलीवरही बोलण्याचे आदित्य यांनी टाळले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in