मराठा आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी दिल्या हर्षवर्धन पाटलांना टिप्स्‌...

या वेळी झालेल्या चर्चेत उदयनराजेंनी हर्षवर्धन पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही टिप्स्‌ दिल्या आहेत. त्याची माहिती ते दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत देणार आहेत. आता आरक्षण प्रश्नावर भाजपने जिल्हास्तरावरून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. यासाठी खासदार उदयनराजेंवरही महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Tips to Harshvardhan Patil given by MP Udayanraje on Maratha reservation issue
Tips to Harshvardhan Patil given by MP Udayanraje on Maratha reservation issue

सातारा : मराठा आरक्षण प्रश्नी भाजपचे सातारा जिल्हा प्रभारी हर्षवर्धन पाटील यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत मराठा आरक्षण प्रश्नावर तासभर चर्चा झाली. या चर्चेत उदयनराजेंनी हर्षवर्धन पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही टिप्स्‌ दिल्या.

भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्याला प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आरक्षण प्रश्नावर त्या त्या जिल्ह्यातील सर्व पक्षिय नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी या प्रभारी नेत्यांवर दिली आहे. सातारा जिल्ह्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.

त्यांना सातारा जिल्ह्याची चांगली माहिती आहे. आता ते भाजपमध्ये असल्याने त्यातच त्यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी असल्याने गेल्या दोन चार दिवसांपासून त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर जिल्ह्यातील सर्व पक्षिय नेत्यांशी चर्चा करण्यास सुरवात केली आहे. आज त्यांनी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावर त्यांनी अर्धातास चर्चा केली.

यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ॲड. भरत पाटील, विकास गोसावी, हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकीता पाटील आदी उपस्थित होते. 
या वेळी झालेल्या चर्चेत उदयनराजेंनी हर्षवर्धन पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही टिप्स्‌ दिल्या आहेत. त्याची माहिती ते दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत देणार आहेत. आता आरक्षण प्रश्नावर भाजपने जिल्हास्तरावरून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. यासाठी खासदार उदयनराजेंवरही महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in