पंढरपूरच्या यशानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर पुणे, कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी - After the success of Pandharpur, the responsibility of Pune, Kolhapur Municipal Corporation fell on MP Ranjitsinh Naik Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

पंढरपूरच्या यशानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर पुणे, कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी

किरण बोळे
बुधवार, 12 मे 2021

त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेवून पक्षाने आता त्यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर व पुणे महानगरपालिका निवडणूकांची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

फलटण शहर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा (Pandharpur Constetuancy) निवडणूकीत भाजपाच्या विजयात महत्वपूर्ण जबाबदारी निभावणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांना पेढा भरवून विशेष अभिनंदन केले. या यशानंतर खासदार निंबाळकर यांच्यावर पुणे (Pune Muncipal Corportation) व कोल्हापूर (Kolhapur Muncipal Corporation) येथील महानगरपालिका निवडणूकीसाठी प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (After the success of Pandharpur, the responsibility of Pune, Kolhapur Municipal Corporation fell on MP Ranjitsinh Naik Nimbalkar)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. या विजयानंतर खासदार निंबाळकर यांनी केलेल्या कामाची दखल घेत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार निंबाळकर यांचे स्वतः पेढा भरवुन विशेष अभिनंदन केले होते.

हेही वाचा : शिवसेना कॅाग्रेसच्या नेत्यांची कानटोचणी करीत आहे का...सरकारमध्ये सर्व हास्यास्पद सुरु..शेलारांचा टोला

त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेवून पक्षाने आता त्यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर व पुणे महानगरपालिका निवडणूकांची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. या दोन महापालिका निवडणूकांची महत्वाची जबाबदारी सोपविल्यानंतर फलटण येथील खासदार रणजितसिंह समर्थकांनी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा : भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी..गोव्याला जा, प्रवास खर्च आम्ही देतो.. चाकणकरांचा टोला

या निमित्ताने फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, प्रशांत कोरेगावकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, सुनिल जाधव, मनोज कांबळे, बाबूमामा शिंदे आदींची उपस्थिती होती.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख