शिवसेना कॅाग्रेसच्या नेत्यांची कानटोचणी करीत आहे का...सरकारमध्ये सर्व हास्यास्पद सुरु..शेलारांचा टोला

"सामना"मधून राष्ट्रवादीची भूमिका मांडली जात आहे.
0ashish_shelar_and_sanjay_raut_20_ff.jpg
0ashish_shelar_and_sanjay_raut_20_ff.jpg

मुंबई  : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून कॅाग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्या कार्यपद्धतीचे कैातुक करण्यात आले आहे. यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली आहे.  "शिवसेना कॅाग्रेसच्या नेत्यांची कानटोचणी करीत आहे का.." असा सवाल आशिष शेलारांनी Ashish Shelar उपस्थित केला आहे. BJP leader Ashish Shelar criticizes Thackeray government Shiv Sena  

कॅाग्रेसच्या नेत्या  सोनिया गांधी यांनी कॅाग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा ‘सामना’ने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही सामना वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. सामना कॅाग्रेसच्या नेत्यांची कानटोचणी करीत आहे का, असा सवाल आशिष सवाल यांनी उपस्थित केला आहे. सामनामधून राष्ट्रवादीची भूमिका मांडली जात आहे. पण  कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी कॅाग्रेसची  आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीतील सर्व  हास्पास्पद सुरु आहे, असा टोला शेलार यांनी लागावला आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे, असे शेलार म्हणाले.  

मराठा आरक्षणावरुन शेलार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाला मराठा समाजाला एप्रिल फुल करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे," असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

हेही वाचा  : भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी.."गोव्याला जा, प्रवास खर्च आम्ही देतो.." चाकणकरांचा टोला 

पुणे : नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठ्याअभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. अशीच घटना काल गोव्यात घडली. गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली आहे. यात २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिकच्या घटनेनंतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर याप्रकरणावरुन टीका केली होती. आता गोव्याला झालेल्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. चाकणकर यांनी टि्वट करुन भाजपच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. आपल्या टि्वटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात, "काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे.  भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com