भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी.."गोव्याला जा, प्रवास खर्च आम्ही देतो.." चाकणकरांचा टोला

राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
3Sarkarnama_20Banner_20_202021_03_08T110500.508.jpg
3Sarkarnama_20Banner_20_202021_03_08T110500.508.jpg

पुणे : नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठ्याअभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. अशीच घटना काल गोव्यात घडली. गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली आहे. यात २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.twenty six patients die goa government hospital Rupali Chakankar slammed bjp

नाशिकच्या घटनेनंतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर याप्रकरणावरुन टीका केली होती. आता गोव्याला झालेल्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. चाकणकर यांनी टि्वट करुन भाजपच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. 

आपल्या टि्वटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात, "काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे.  भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत."
 
'लेटर बॅाम्ब' नेते गुलाम नबी आझाद यांना कॅाग्रेसनं सामावून घेतलं..दिली नवीन असाइनमेंट..

 
गोव्याच्या शासकीय रुग्णालयात मंगळवारी पहाटे २ ते ६ या कालावधीत २६ रुग्ण दगावले, असे राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले, मात्र मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यास त्यांनी नकार दिला. या रुग्णालयाला सोमवारी प्राणवायूचा पुरवठा कमी झाला होता, हे मात्र त्यांनी मान्य केले. या रुग्णालयाला प्राणवायूच्या मोठ्या १२०० सिलिंडरची गरज होती. त्यापैकी फक्त ४०० सिलिंडर सोमवारी उपलब्ध झाले होते, असे राणे यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी रुग्णालयाला पुरेसा प्राणवायू पुरवठा नव्हता, अशी कबुली राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. 


हेही वाचा : आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या जल्लोष पडला महागात... 
  
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे  सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवसाचा जल्लोष करणे कार्यकर्त्यांना चांगलेच भोवले.  आंबेडकरांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला.  या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरच्या जवळ १० मे रोजी रात्री केक कापून जल्लोष करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधक ठरली. भीमनगरमध्ये गर्दी दिसून आल्याने आणि फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचे पाहून डाबकी रोड पोलिसांनी घटनास्थळ आले. या वेळी तेथे नागरिकांची मोठी गर्दी होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत आठ दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com