गडाखांबाबत विखेंनी काय मध्यस्थी केली, ज्यामुळे फडणवीस नरमले - What did Vikhen mediate about Gadakha, which softened Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

गडाखांबाबत विखेंनी काय मध्यस्थी केली, ज्यामुळे फडणवीस नरमले

मुरलीधर कराळे
बुधवार, 10 मार्च 2021

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झाला. आमच्या शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस घेतला नाही, म्हणून ऊस जाळून टाकला, हे चित्र विदारक आहे. परंतु मंत्री म्हणाले, की आपण सर्व ऊस घेऊ. निवडणूका संपल्या की सत्ता पक्ष व विरोधी पक्ष विसरून त्यांचा ऊस घेतला पाहिजे.

नगर ः कारखान्यांनी ऊस घेतला नाही, म्हणून शेतकरी ऊस जाळून टाकतात. परंतु मंत्री म्हणतात आम्ही सर्व ऊस घेऊ. शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांनी घेतला नाही, तर मी स्वतः तेथे येऊन आंदोलन करील, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. दरम्यान, विखे पाटलांनीही याबाबत मध्यस्थी केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे फडणवीस नरमले. विखेंनी नेमका काय मध्यस्थी केली, याबाबत उत्सुकता आहे.

नेवासे तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी मागील महिन्यात स्वतःचा ऊस पेटवून दिला. कारखाने ऊस घेत नाहीत, असा आरोप करून त्यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप केले. याचे पडसाद आज विधानसभेच्या अधिवेशनात उमटले.

हेही वाचा... विधान परिषद सदस्यांना हवाय हा अधिकार

याबाबत फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले, की या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झाला. आमच्या शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस घेतला नाही, म्हणून ऊस जाळून टाकला, हे चित्र विदारक आहे. परंतु मंत्री म्हणाले, की आपण सर्व ऊस घेऊ. निवडणूका संपल्या की सत्ता पक्ष व विरोधी पक्ष विसरून त्यांचा ऊस घेतला पाहिजे. याबाबत विखे पाटील यांनीही मध्यस्थी केली. परंतु मी सांगतो, जर शेतकऱ्यांचा ऊस घेतला नाही, तर मी स्वतः जाऊन तेथे आंदोलन करील.

राजकीय नेमका काय हालचाली

दरम्यान, विखे आणि गडाख यांच्यात खूपच राजकीय सख्य नाही, असे मानले जाते. अशाही परिस्थितीत फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे विखे पाटील यांनी याबाबत मध्यस्थी केली. ही मध्यस्थी नेमका काय केली, असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याचा परिणाम आगामी काळात राजकीय बदलाचे संकेत आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

 

हेही वाचा...

अर्थसंकल्प म्हणजे राज्याची फसवणूक : विखे पाटील 

नगर : "महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात समाजातील कोणत्याही घटकांना न्याय मिळालेला नाही. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठीही कोणतीच योजना जाहीर नाही. दुष्काळमुक्‍त महाराष्ट्रासाठी सुरू केलेल्या योजनांनाही कोणत्या निधीची आर्थिक तरतूद नसल्याने, हा अर्थसंकल्प म्हणजे राज्याची फसवणूक आहे,'' अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

हेही वाचा... हे तर गृहखात्याचे अपयश

अर्थसंकल्पाच्या चर्चेत सहभाग घेऊन आमदार विखे पाटील यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवत, शेतकरी, दूधउत्पादक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्‍नांबाबत सरकारला जाणीव करून दिली. सामाजिक विभागाच्या निधीला कात्री लावल्याबद्दल सरकारवर टीकेची झोड उठविली. राज्याच्या इतिहासात प्रथमच सामाजिक क्षेत्राचा निधी कमी केल्याबद्दल त्यांनी अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्‍त केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख