कोरोनाची लस, वादळग्रस्तांना मदतीतही भ्रष्ट्राचार ! जयंत पाटील यांचा आरोप - Corona vaccine, corruption in helping storm victims! Jayant Patil's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाची लस, वादळग्रस्तांना मदतीतही भ्रष्ट्राचार ! जयंत पाटील यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

मढ्यावरचे लोणी खाणारे हे अधिकारी आहेत. करोडो रुपये गोळा झाले, त्याचे काय झाले, हे सांगायला हवे. या सर्व प्रकाराची चाैकशी झाली पाहिजे.

मुंबई ः महाराष्ट्रात कोरोनाची लस देण्याबाबत मागणी आली. कोरोना, वादळग्रस्त भागासाठी जी मदत आली, त्यात मोठा भ्रष्ट्राचार झाला आहे. लोकांनी पैसे दिले, वस्तुरुपाने मदत दिले. मढ्यावरचे लोणी खाणारे हे अधिकारी आहेत. करोडो रुपये गोळा झाले, त्याचे काय झाले, हे सांगायला हवे. या सर्व प्रकाराची चाैकशी झाली पाहिजे. वादळात आम्ही काम करीत असताना जिवाची पर्वा न करता वाऱ्यावर फिरलो. त्याचा अपहार जर होत असेल, तर हे बरोबर नाही. याचा उल्लेख कुठेही दिसत नाही, याचा खेद वाटतो, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा... बारामतीकर चंद्र व सूर्यही एकत्र आणतील

विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पाटील बोलत होते. ते म्हणाले, की मी एक भूमिका घेऊन माझ्या जिल्ह्यात काम करतो आहे. रायगड जिल्ह्यात, कोकणात एका विशेष कामाचा उल्लेख करतो. मुंबई आता सरकरत खंडाळ्याच्या घाटात गेली आहे. ती आता कोल्हापूरपर्यंत जाणार आहे. मुंबईचे आधुनिकीकरण होते आहे. जमिनीचे व्यवहार जसे चालू आहेत, ज्या गतीने चालू आहेत, त्याचा मला खेद होतोय. रायगड जिल्ह्यातील सर्व क्षेत्र सिडकोचे क्षेत्र म्हणून जाहीर केले. हे मंजूर आहे, हे मला मंजूर नाही. त्या वेळी 20 मिनिटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाद झाला होता. जे नुकसानभरपाई पणवेल, नवी मुंबईकरांना ठरली आहे, तीच भरपाई रायगड जिल्ह्यालाही मिळाली पाहिजे, ही आमची मागणी होती. ती मान्य झाली होती. 

हेही वाचा... शिवदीप लांडे यांची धडाकेबाज कारवाई

बेळगावबाबत किती वर्षे भांडणार

सीमा भागातील प्रश्नांबाबत चेष्टा आपण करतो. बेळगाव आपल्याकडे आला पाहिजे. त्यातील साडेतीन तालुकेच आपण मागतो आहे. मला वाटतं, हे देण्याचंही कबूल केलं. परंतु बेळगाव शहरातील लोकांचा विरोध आहे. याप्रश्नी किती वर्षे भांडणार आहोत. न्यायालयात काय परिस्थती आहे, हे अद्यापही कोणाला सांगता येत नाही. मला बेळगावमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावतात. मी जात नाही. तेच तेच भाषणं कुठपर्यंत द्यायचे, असा प्रश्न आहे.  त्यामुळे याबाबत ठोस अशी भूमिका घेणे आवश्यक आहे. किती वेळा कोर्टात खटला उभा राहिला, याचा उल्लेख येथे नाही. याच प्रश्नी माजी मुख्यमंत्री अंतुले यांनी चांगले पुस्तक लिहिले. याचा उल्लेख कुठेही नाही. याचा मला खेद वाटतो, असे पाटील म्हणाले. 

 Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख