महाविकास आघाडी सरकार म्हणजे `लव्ह जिहाद!` : बारामतीकर सूर्य व चंद्रही एकत्र आणतील...

महाविकास आघाडीचे सरकार हे बेईमानाच्या आधारे सत्तेत आले आहे. बारामतीकरांनी ठरवले तर एक वेळ दक्षिण- उत्तर एकत्र येतील. सूर्य आणि चंद्र देखील एकत्र येतील. हा `लव्हजिहाद` सारखा प्रकार आहे. ही राजकीय फसवणूक आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार हे बेईमानाच्या आधारे सत्तेत आले आहे. बारामतीकरांनी ठरवले तर एक वेळ दक्षिण उत्तर एकत्र येतील. सूर्य आणि चंद्र देखील एकत्र येतील. हा लव्ह जिहाद सारखा प्रकार आहे. ही राजकीय फसवणूक आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. 

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या आज शेवटच्या दिवशी ते बोलत होते. यावेळी शिवसेना- भाजप युतीचा संदर्भ देत त्यांनी शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करीत, तुमची व आणची मैत्री तीस वर्षे अर्थात दहा हजार 950 दिवसांची आहे. अजित पवारांची मैत्री 72 तासांचीच होती, तरीही त्यांनाही आम्ही आपलेच मानतो. त्यामुळेच `दोस्त कहा भी होता है. ना उसे हम समझाते है. सही मार्गपर लाने की कौशीश करते है. ते प्रयत्न करीत राहू. बारामतीचे संशोधन हे पुस्तक मी पहात होतो, त्यात टोमॅटो व बटाटा एकाच झाडाला आले आहेत. बारामतीकरांनी ठरवले तर ते दक्षिण व उत्तर देखील एकत्र आणतील. सूर्य-चंद्र देखील एकत्र येतील, अशी टीका त्यांनी केली. 

मुनगंटीवार म्हणाले, हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. कोविडवर त्यांना काहीही करता आलेले नाही. तरीही ते स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. त्यांना दहा पैकी शून्य गुण मिळाले आहे. मात्र ते एक आणि शून्य असे लिहून आरशात पाहावे व दहा गुण मिळाल्याचे सांगावे, असा प्रकार आहे. उत्तर प्रदेशाची लोकसंख्या अधिक आहे. तेथे आठ हजार 627 मृत्यू झाले. महाराष्ट्रात बावन्न हजार 184 मृत्यू झाले. आरोग्य विभागाला एक रुपयाही वाढवून दिले नाहीत. हे यश कसे होऊ शकते? कोरोनाची भीती दाखवून तुम्ही अधिवेशनालाही कात्री लावली आहे. मात्र म्हणत आहात, शूर आम्ही सरदार आम्हाला कोरोनाची भीती! अबु आझमी काल सांगत होते की खाजगी रुग्णालयात उपचार घेतले त्याचे बिल 43 लाख रुपये झाले. त्याची चौकशी कोण करेल, असा प्रश्न त्यांनी केला. 

वांझोटे, उडाणटप्पू आणि करंटे !
राज्य सरकार विविध विषयांवर पैसे नाही असे सांगतात. विधीमंडळाच्या रंगरंगोटीसाठी 15.61 कोटींची निविदा काढण्यात आली. चमकवण्यासाठी पैसे आहेत, मात्र गरीबांच्या घरातल्या अंधार घालवण्यास सरकारकडे पैसे नाहीत. रमाई योजना, दिव्यांग, वृद्ध कलावंत असे जे जे चांगले आहे, त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे या सरकारचे वर्णन संसदीय शब्दांत करायचे तर हे सरकार वांझोटे, उडाणटप्पू आणि त्याचे निर्णय म्हणजे करंटेपणा असेच होऊ शकतात. हे संसदीय शब्द असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com