IPS शिवदीप लांडे यांची धडाकेबाज कारवाई   - IPS Shivdeep Lande's aggressive action | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

IPS शिवदीप लांडे यांची धडाकेबाज कारवाई  

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 मार्च 2021

एटीएसने मंगळवारी हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांत अनेक ठिकाणी छापे टाकले असून अजूनही छापेमारी सुरु आहे.

मुंबई : महाराष्ट्र एटीएसने मोठ्या ड्रग्ज रॅकेटवर कारवाई दणक्यात सुरु केली आहे. एटीएसने मंगळवारी हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांत अनेक ठिकाणी छापे टाकले असून अजूनही छापेमारी सुरु आहे. या छाप्यात आतापर्यंत २ जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. 

यामध्ये हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात एका हॅाटेलमध्ये (मनाली क्रीम) चरसची तस्करी करणाऱ्या टोळीच्या  मोहरक्याचा एटीएसच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र एटीएसचे अतिरिक्त सह पोलिस आयुक्त शिवदीप लांडेंच्या पथकाने ही कारवाई केली.

जयंत पाटलांनी धूर्तपणे केलेले करेक्ट कार्यक्रम 

या तस्तरांच्या मुस्क्या आवळण्यासाठी लांडे यांच्या पथकाने हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यामध्ये या तस्करितील मुख्य सूञधार रुमी ठाकूरला एटीएसने मंगळवारी अटक केली. रूमीला आज बुधवार (ता. ३ मार्च) पुण्याच्या शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

रूमी ठाकुर हा कुल्लू मनालीला एक रिवर व्यूव नावाचे हॅाटेल चलवत होता. तो मुंबई, गोवा, बैंगलुरु आणि पुणे येथे चरसची तस्करी करत होता. या प्रकरणात दोन अन्य महत्वाच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक हिमाचल प्रदेशला गेले आहे.
  
नेमके प्रकरण काय? 

डिसेंबर २०२० मध्ये पुणे पोलिसांनी हिमाचल प्रदेशच्या दोन तस्करांना ३२ किलो चरसह अटक केली होती. ज्याची किंमत १ कोटी २० लाख रुपये होती. आरोपींच्या चौकशीत त्यांनी हे ड्रग्ज ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी आणले होते. हे ड्रग्ज मुंबई, पुणे, गोवा आणि बैंगलुरु येथे पाठवण्यात येणार असल्याचे उघड झाले होते. या आरोपिंकडून मिळालेल्या माहितीनूसार एटीएसने ही कारवाई केली आहे. 

फडणवीस, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ यांच्यावर पुणे पोलिस गु्न्हा दाखल करणार?
 

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपिंनी हे ड्रग्ज दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये लपवून मनालीहून दिल्लीला आणले. तेथून ट्रेनने आणि सार्वजनिक वाहनांतून ते मुंबई आणि पुण्यात आणले होते, अशी माहिती आरोपिंनी पोलिसांना दिली होती. या प्रकारांना आळा घालण्यासाठी एटीएसच्या पथकाने धडक हिमाचल प्रदेशमध्येच कारवाई केली.   
Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख