कोरोनामुळे पाटण तालुक्यात बळी गेल्यास शांत बसणार नाही : सत्यजितसिंह पाटणकरांचा इशारा  - We will not keep quiet if someone is killed due to inadequate facilities says Satyajitsinh Patankar | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुळे पाटण तालुक्यात बळी गेल्यास शांत बसणार नाही : सत्यजितसिंह पाटणकरांचा इशारा 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 मे 2021

पाटण तालुक्‍यातील रुग्णांना उपचारासाठी कऱ्हाड, साताऱ्याला जावे लागत आहे; परंतु तिथेही या रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, तरीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

पाटण : पाटण तालुक्‍यातील कोरोना रुग्णांसाठी पाटण कोरोना केअर सेंटरला (Patan Corona Care Center) 50 बेड देण्याची घोषणा केली होती. अद्याप त्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यापुढे प्रशासकीय यंत्रणा किंवा अपुऱ्या सुविधांमुळे कोणाचा बळी गेला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते (Nationalist Congress Party) सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar) यांनी दिला. (We will not keep quiet if someone is killed due to inadequate facilities says Satyajitsinh Patankar)

श्री. पाटणकर म्हणाले, "पाटण तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची पहिली लाट परतवून लावणारा पाटण तालुका दुसऱ्या लाटेत बेजार झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या उपचार सुविधा अशी स्थिती आहे. तालुक्‍यातील कोविड सेंटरसाठी वाढीव बेड व इतर आवश्‍यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते; परंतु अद्यापही त्या मिळालेल्या नाहीत.

हेही वाचा : 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण..मुख्यमंत्र्यांचे परिस्थितीवर लक्ष

पाटण तालुक्‍यातील रुग्णांना उपचारासाठी कऱ्हाड, साताऱ्याला जावे लागत आहे; परंतु तिथेही या रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, तरीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या आम्ही वैयक्तिक खर्चातून व संस्थांच्या मदतीने पाटण सेंटरला ऑक्‍सिजन बेड उपलब्ध केले.

आवश्य वाचा : भाजपचे आमदार बेपत्ता. एक हजारांचे बक्षिस जाहीर..

अतिरिक्त सुविधांचा प्रशासनाने तत्काळ व तितक्‍याच गांभीर्याने विचार करावा. त्यासाठी वाटेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत.'' माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रमसिंह पाटणकर यांच्या मागणीनुसार तालुक्‍याला चार व्हेंटिलेटर आणि दहा ऑक्‍सिजन मशिन तालुक्‍याला मिळणार असल्याचेही श्री. पाटणकर यांनी सांगितले. 

पाटणकरांकडून सव्वा लाखांचा निधी....

पाटण मतदारसंघातील रुग्णांची ऑक्‍सिजनविना गैरसोय होऊ नये, यासाठी युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला 25 ऑक्‍सिजन सिलिंडरसाठी सव्वालाखाचा धनादेश सुपूर्द केला. ऑक्‍सिजनची सुविधा नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कऱ्हाड व सातारा या ठिकाणी पाठवावे लागत आहे. यंदाही रुग्णांना ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याने मोठे हाल होत आहेत. त्याचा विचार करून पाटणकर यांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सव्वालाखाचा धनादेश दिला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख