भाजपचे आमदार बेपत्ता. एक हजारांचे बक्षिस जाहीर..

रामनगर विधानसभा मतदारसंघात अद्रा गाव येथे हे पोस्टर लावण्यात आले आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-17T091538.905.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-17T091538.905.jpg

बाराबंकी (उत्तरप्रदेश) : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यातील रामनगरचे भाजप आमदार शरद अवस्थी  BJP MLA Sharad Awasthi बेपत्ता झाल्याचे पोस्टर शहरात लावल्याने चर्चेचा विषय ठरलं आहे. bjp mla sharad awasthi missing in up reward of 1 thousand will be given for revealing the address poster viral 

भाजप आमदार शरद अवस्थी Sharad Awasthi यांचा पत्ता देणाऱ्या एक हजार रुपये बक्षिस देण्यात येणार असल्याचे या पोस्टरवर जाहीर करण्यात आले आहे. या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

हे पोस्टर रामनगर विधानसभा मतदारसंघात अद्रा गाव येथे लावण्यात आले आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे की आमदार शरद अवस्थी यांचा पत्ता देणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपये बक्षिस देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार अवस्थी एकदाही गावात आले नाही. गावात अनेक समस्या आहे, त्या सोडविणे गरजेचं आहे. पण अवस्थी हे मतदार संघात फिरकत नाहीत. समस्या घेऊन गावातील लोक येत असतात, पण ते भेटत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या समस्था कुणाकडे मांडणार, असा सवाल गावकऱ्यांनी विचारला आहे. 

कोरोनामुळे जनतेचे हाल होत आहे. या संकटात आमदार अवस्थी यांनी जनतेला कोणतीही मदत केलेली नाही. याबाबत आमदार अवस्थी यांना विचारले असता ते म्हणाले की मला बदनाम करण्यासाठी समाजवादी पक्षाने हे काम केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मी दहा वेळा माझ्या मतदारसंघात जाऊन आलो आहे, असा दावा त्यांनी केला आहे. 

Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com