tauktae cyclone : 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण..मुख्यमंत्र्यांचे परिस्थितीवर लक्ष - cyclone tauktae live updates storm now extremely severe heavy rains in mumbai alert  | Politics Marathi News - Sarkarnama

tauktae cyclone : 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण..मुख्यमंत्र्यांचे परिस्थितीवर लक्ष

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 मे 2021

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई  : ‘तौत्के’ चक्रीवादळाचा Tauktae Cyclone तडाखा राज्यात जाणवत आहे. अनेक ठिकाणी सकाळपासून (rains) जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत.  तौत्के चक्रीवादळानं tropical cyclone tauktae गती घेतल्यामुळं त्याचा फटका  समुद्र किनाऱ्यालगत बसत आहे.  त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. cyclone tauktae live updates storm now extremely severe heavy rains in mumbai alert 

या चक्रीवादळाच्या  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही पुन्हा आढावा घेणार आहेत. 

भाजपचे आमदार बेपत्ता..पत्ता देणाऱ्याला एक हजारांचे बक्षिस जाहीर..

रत्नागिरी  जिल्ह्यातील 3 हजार 896  ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील  8 हजार  380  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे,  मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य  प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.

गोवा किनारपट्टी, केरळ, तामिळनाडू ओलांडून तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं हळूहळू सरकू लागलं आहे. वादळाचा वेग ताशी २० किमी असून, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख