वारकऱ्यांचे आंदोलन पोलिसांकडून मोडीत; पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल.....

किमान पन्नास लोकांना पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी वारंवार विनंती शासनाकडे केली. परंतु शासनाला यामध्ये कोणताही पाझर फुटला नाही.
Opposition to palanquins will cost the government dearly says Bandatatya Karadkar
Opposition to palanquins will cost the government dearly says Bandatatya Karadkar

कराड : आळंदीवरुन पंढरपुरला पायी वारीने जाण्यासाठी निघालेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, कीर्तनकार बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पुण्याच्या तापकीर वाडीतून ताब्यात घेतलं होते. त्यांना आज कराडच्या करवडी येथील त्यांच्या गोपालन केंद्रात पोलिसांनी आज शनिवारी आणून स्थानबद्ध केले आहे. यावर बंडातात्यांनी वारकरी संप्रदायाचे चाकोरीबद्ध चाललेले आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले असून ज्ञानेश्वर, तुकारामांच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला. Warkaris' agitation thwarted by police; Opposition to palanquins will cost the government dearly .....

कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने आषाढी वारीसाठी नियमावली जारी केली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारचा निर्णय नाकारुन बंडातात्या पायी वारीसाठी निघाले होते. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे बंडातात्या कराडकर यांनी आळंदी येथे जाहीर केले होते. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. 

या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तेथे पोहोचले, त्यावेळी पोलिसांनी त्यांनाही दिगी येथील संकल्प मंगल कार्यालयात ताब्यात घेतले. त्यानंतर बंडातात्या यांना पुणे पोलिसांनी कराड तालुक्यातील करवडी येथील त्यांच्या गोपालन केंद्रात आणून कराड पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बंडातात्या म्हणाले, पोलिसांनी घेतलेला निर्णय हा त्यांचे वरिष्ठांचे आदेश देतात, त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली आहे.

वारकऱ्यांबाबत शासनाने घेतलेली भूमिका निषेधार्ह आहे. वारकर्‍यांची आंदोलन गुंडाळण्याची ही जी असुरी पद्धत आहे, त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल. माझी भूमिका कोणी समजून घेतली नाही. आमच्या भूमिकेबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया चालू आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर संकट आहे, तरीही आग्रह का धरला आहे, प्रश्न उपस्थित केला जात आहे. 29 मार्च पासून आम्ही शासनाचा पाठपुरावा करत गेले तीन महिने झाले. 

किमान पन्नास लोकांना पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी वारंवार विनंती शासनाकडे केली. परंतु शासनाला यामध्ये कोणताही पाझर फुटला नाही. शेवटी आम्ही आव्हान दिल्याप्रमाणे काल सायंकाळी सात वाजता आमच्या नियमाप्रमाणे पायी वारी सुरू केली. तेथे आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या कराड येथे गो- पालन केंदात स्थानबद्ध केलेले आहे. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना उग्र निदर्शने करु नये, असेही आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com