आमीर खान अन् किरण राव यांची लग्नाच्या 15 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा पण...

अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नाच्या 15 वर्षांनतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
acto aamir khan and kiran rao announce diovorce after 15 years of marriage
acto aamir khan and kiran rao announce diovorce after 15 years of marriage

मुंबई : अभिनेता आमीर खान (Aamir Khan) आणि दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) यांनी घटस्फोटाची (Divorce) घोषणा केली आहे. लग्नाच्या 15 वर्षांनतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी त्यांनी त्यांचा मुलगा आझाद (Azad) यांचे एकत्रित संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर पाणी फाऊंडेशनसह (Paani Foundation) अनेक समाजोपयोगी उपक्रमांममध्ये ते एकत्रितपणे काम करीत राहणार आहेत. 

आमीर खान यांच्या हा दुसरा विवाह होता. कन्या इरा खान हिच्यासोबत त्यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नाचा 15 वा वाढदिवस गीर राष्ट्रीय अभयारण्यात साजरा केला होता. किरण राव यांच्यासोबत विवाह केल्यानंतर 15 वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या वेगळे होण्याची तयारी सुरू होती. त्यांनी याबाबत निवेदन जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही 15 वर्षांच्या सुंदर सहजीवनात आयुष्यातील अनेक अनुभव, आनंद आणि हास्य यांची देवाणघेवाण केली. या नात्यासोबत आमच्यातील विश्वासही वाढीस लागला. 

आम्ही आता आमच्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करीत आहोत. यापुढे आम्ही नवरा आणि बायको असणार नाही. काही दिवसांपूर्वीच आम्ही वेगळे होण्याची तयारी सुरू केली होती. आता त्याला अंतिम स्वरुप दिले आहे. आम्ही वेगवेगळे राहणार असलो तरी आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांशी जोडलेले असू. आझादचे संगोपन आम्ही दोघे मिळून करणार आहोत. याचबरोबर पाणी फाउंडेशनसोबत इतर उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र काम करु, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. 

कायम पाठिंबा देणारे कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानून त्यांनी म्हटले आहे की, आमचे नाते समजून घेतल्याबद्दल कुटुंबीय आणि मित्रांचे अतिशय धन्यवाद. त्यांच्याशिवाय आम्हाला हा निर्णय घेणे शक्य नव्हते. आमच्या हितचिंतकांनी आमच्यासाठी त्यांच्या शुभेच्छा कायम ठेवाव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नाही तर ही नवीन प्रवासाची सुरवात आहे. आभार आणि प्रेम किरण आणि आमीर. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com