पालिका आयुक्तांचा आदेश अन् त्यावर पोलीस आयुक्तांची 24 तासांतच धडाकेबाज कारवाई - pimpri police registers case against two contractors of pcmc | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पालिका आयुक्तांचा आदेश अन् त्यावर पोलीस आयुक्तांची 24 तासांतच धडाकेबाज कारवाई

उत्तम कुटे
शनिवार, 3 जुलै 2021

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी : निविदेसाठी अनुभवाचा खोटा दाखला देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेची (PCMC) कामे मिळवलेल्या दोन ठेकेदारांविरुध्द (Contractors) महापालिकेची फसवणूक केल्याचा गुन्हा पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) आज  दाखल केला. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध फौजदारी करण्याचा आदेश कालच (ता.२) दिला होता. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तातडीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून कार्यवाही झाली आहे. 

खराळवाडी (पिंपरी) मे. राजेश इंजिनिअरिंग अॅन्ड कंपनीचे मालक रेवजी सहादू घाटगे (वय ६९) आणि बिबवेवाडी (पुणे) येथील संजीव प्रिसिजनचे  मालक संजीव यशवंत चिटणीस  (वय ६५) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ठेकेदारांची  नावे आहेत. याअगोदर पाटील यांनी बनावट एफडीआर देऊन पालिकेला लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यातील दहा जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

आज त्यांनी आणखी दोन ठेकेदारांवर फौजदारी केल्याने महापालिकेच्या सर्व ठेकेदार मंडळींचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र या ठेकेदारांना देणारेही अडचणीत आले आहेत. महापालिकेचे काही अधिकारीसुद्धा या प्रकरणात सामील असल्याचा संशय आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, पोलिसांकडून गुन्हा नोंदवल्यानंतरची पुढील कारवाई झालेली नाही. आजच्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही प्रकरणात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दोन वेगवेगळे कार्यकारी अभियंते फिर्यादी आहेत. 

हेही वाचा : आमीर खान-किरण राव 15 वर्षांनंतर वेगळे होणार पण...

चिटणीस या कंत्राटदाराने पुणे महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचे काम केल्याचा खोटा अनुभवाचा दाखला देऊन पिंपरी महापालिकेचे काम मिळवले आहे. विद्युतचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून त्यांनी तो घेतलेला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅस सिलिंडर साठवणुकीसाठी शेड बांधणे, दहा तास क्षमतेचे क्लोरीनेटर्स पुरवणे आदी कामाचा अनुभव असल्याचा खोटा दाखला त्यांनी पिंपरी महापालिकेचे टेंडर मिळवण्यासाठी दिला होता. तर, दुसरे पाणीपुरवठा कंत्राटदार घाटगेंनी पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक या केंद्र सरकारच्या कंपनीचे काम केल्याचे बनावट अनुभव प्रमाणपत्र देऊन पिंपरी महापालिकेचे एक कोटी रुपयांचे काम मिळवले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख