शैक्षणिक फी माफीसाठी लसीकरणाची पूर्ण रक्कम वापरा : भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

देशातील जवळपास सर्वच राज्यांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या फी मध्ये निम्मी सवलत जाहीर केली. परंतु सर्वांनी मागणी करूनही महाराष्ट्राने ते केले नाही. आता राज्य सरकारकडे साडेसहा हजार कोटी रुपये तयार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने कोणतीही सबब न सांगता हा संपूर्ण निधी विद्यार्थ्यांच्या 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाच्या फी मध्ये सवलत देण्यासाठी वापरावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
Use full amount of vaccination for education fee waiver: Bhatkhalkar's demand to CM
Use full amount of vaccination for education fee waiver: Bhatkhalkar's demand to CM

मुंबई : देशातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याने महाराष्ट्रातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्यासाठीचे साडेसहा हजार कोटी रुपये, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या फीमाफी साठी वापरावेत, अशी मागणी कांदिवली (पूर्व) चे भाजप आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Udhav Thackeray यांना पत्राद्वारे केली आहे. Use full amount of vaccination for education fee waiver: Bhatkhalkar's demand to CM

केंद्र सरकारने ने एप्रिल महिन्यातच राज्यांना लस खरेदी करण्याचे अधिकार दिले. त्यानंतर 28 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे राज्य सरकार मोफत लसीकरण करेल, असे जाहीर केले. त्यासाठी लागणारी साडेसहा हजार कोटी रुपयांची रक्कम एका चेकने देण्याची वल्गनाही त्यांनी केली. परंतु ग्लोबल टेंडरचा जप करूनही 35 दिवसांत एकही लस ते विकत घेऊ शकले नाहीत. राज्य सरकारांना लस विकत घेणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे केंद्र सरकारकडूनच लसीकरण करण्याचे जाहीर केले. 

त्यामुळे महाराष्ट्राचे साडेसहा हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. प्रत्येक वेळी राज्य सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारने एका रुपयाची सुद्धा मदत केली नाही. महाविकास आघाडी सरकारने किमान आता तरी उदारता दाखवावी व शालेय विद्यार्थ्यांना या रकमेतून फी सवलत द्यावी.

देशातील जवळपास सर्वच राज्यांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या फी मध्ये निम्मी सवलत जाहीर केली. परंतु सर्वांनी मागणी करूनही महाराष्ट्राने ते केले नाही. आता राज्य सरकारकडे साडेसहा हजार कोटी रुपये तयार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने कोणतीही सबब न सांगता हा संपूर्ण निधी विद्यार्थ्यांच्या 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाच्या फी मध्ये सवलत देण्यासाठी वापरावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

रकमेतून पॅकेज द्या : उपाध्ये

तर तरुणांचे लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याने राज्य सरकारच्या वाचलेल्या या रकमेतून गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजप चे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. हे पैसे राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता वितरित करावेत व गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com