माझा वाळूचा  धंदा नाही; पण नारायण राणेंची हऱ्या, नाऱ्या गँग होती! - i do not have sand business, but Narayan rane use to have Gang, Nashik Politics. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

माझा वाळूचा  धंदा नाही; पण नारायण राणेंची हऱ्या, नाऱ्या गँग होती!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 जून 2021

माझा वाळूचा धंदा नाही, मात्र माझ्यावर आरोप करणारे निलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांची हाऱ्या-नाऱ्या गॅंग होती याची मला माहिती आहे, असे शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

जळगाव : माझा वाळूचा धंदा नाही. ( i do not have a Sand Business) याबाबत आरोप करण्याआधी त्यांनी माहिती घेतली असती तर बरे झाले असते. (Nilesh Rane shall have get proper Information) तसे न केल्याने त्यांनी माझा वाळूचा धंदा असल्याचे असत्य विधान केले. माझा वाळूचा धंदा नाही, मात्र माझ्यावर आरोप करणारे निलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांची हाऱ्या-नाऱ्या गॅंग होती याची मला माहिती आहे, असे शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Blaim by Minister Gulabrao Patil) यांनी सांगितले. 

यावेळी श्री. पाटील यांनी राणे यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आपला वाळूचा धंदा असल्याचा आरोप पूर्णतः खोटा आहे. मात्र हा आरोप करणाऱ्या निलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांची `हाऱ्या-नाऱ्या`ची गँग होती. हे सगळ्यांना माहिती आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. 

भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे सोमवारी जळगावला आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर  पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यानी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाळूचा धंदा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, मराठा आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जनतेला देखील ते ठाऊक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी आपली भूमिका मांडली आहे. शासन स्तरावर विविध निर्णय घेण्यात आले आहे. कार्यवाही सुरु आहे. राज्य मागास वर्ग आयोग नियुक्त करण्यात आला आहे. मात्र विरोधी पक्ष प्रत्यक प्रश्नावर राजकारण करण्याची कोणतिही संधी सोडत नाही. त्यामुळेच केवळ विरोधक म्हणून श्री. यांना सरकारच्या विरोधात टीका करणे भाग आहे.  ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. 

ते म्हणाले, आपला वाळूचा धंदा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तो साफ चुकीचा आहे. आपला वाळूचा धंदा असल्याचे त्यांनी शिद्ध करून दाखवावे, असे त्यांना आपले खुले आव्हान आहे. आपला वाळूचा धंदा नाही, मात्र निलेश राणे यांच्या वडिलांची `हऱ्या नाऱ्या` गँग होती याची आपल्याला चांगली माहिती आहे.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी महावितरण कार्यालयास केलेल्या टाळा ठोको आंदोलनाचे समर्थन केले. ते आमदार पाटील शिवसैनिक आहे. त्यांना जेथे अन्याय दिसेल तेथे तेथे त्याविरोधात ते आंदोलन करतील. तो शिवसेना कार्यकर्त्याचा, नेत्यांचा जनतेविषयीची आपुलकी, व स्थायी भाव आहे.
...

हेही वाचा...

अजय बोरस्ते म्हणाले, विकासासाठीच माझे समर्थन!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख