माजी मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांनी दुर्लक्ष केलेल्या 'कृष्णा'च्या निकालाकडे लक्ष

सत्ताधारी भोसले गटाच्या कारभारावरून त्यांना घेरण्याची व्यूव्ह रचना संस्थापक व रयत पॅनेल आखली. त्याचवेळी रयत संस्थापकवर व संस्थापक रयतवरही हल्ले करत होते
Two Guardian Ministers, including the former Chief Minister, ignored the election of Krishna Karkhana
Two Guardian Ministers, including the former Chief Minister, ignored the election of Krishna Karkhana

कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या यशवंतराव कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अनपेक्षितपणे तीन पॅनेलमुळे प्रतिष्ठेची व चुरशीची केली. निवडणुकीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. परिणामी कार्यकर्त्यांचीही विभागणी झाली. मात्र त्या तिघापैकी कोणीही समोर आले नाही. तर दुसरीकडे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी रयत पॅनेलकडून सक्रीय सहभाग घेवून प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे या सर्वांच्या प्रतिष्ठेच्या या निवडणुकीच्या उद्या (गुरूवारी) लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Two Guardian Ministers, including the former Chief Minister, ignored the election of Krishna Karkhana

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. त्यात कऱ्हाड व वाळवा फोकस आहे. त्याशिवाय कडेगांव व पलूस तालुक्यातूनही काही घडामोडी महत्वाच्या आहेत. निवडणुकीत अर्ज माघारीपर्यंत कोणाचे एकत्रीकरण होईल, याचा अंदाज अनेक राजकीय दिग्गजांना आला नाही. संस्थापक पॅऩेलचे अविनाश मोहिते व रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या एकत्रीकरणाचे प्रयत्न असफल झाल्याने अखेर सत्ताधारी सहकार पॅनेल विरूद्ध संस्थापक व रयत पॅनेल यांच्यात लढत झाली.

त्यात रयततर्फे सहकार राज्यमंत्री कदम यांनी निवडणूक केवळ प्रतिष्ठेचीच नव्हे तर निवडणुकीची सुत्रेच त्यांच्या यंत्रणेने हाती घेतली. त्यामुळे त्याचे कसब कृष्णाकाठावर पणाला लागले आहे. ज्येष्ठ विचारवंत (कै.) यशवंतराव मोहिते म्हणजे (कै.) ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचा राजकीय 'गॉडफादर'. कदम व मोहिते घराण्याचे सख्य सर्वदूर परिचित आहे. मानसपूत्र म्हणून कृष्णा कारखान्यात मोहिते गटाची धडाडणारी तोफ म्हणजे पतंगराव कदम होते. त्यांचा सक्रीय सहभाग नेहमीच असायचा. अनेक सभा गाजवत सत्तांतराचे साक्षीदारही ते झाले.

त्यांच्या पश्चात होणाऱ्या कृष्णाच्या पहिल्या निवडणुकीत त्यांचे पुत्र व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यांची जागा सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. ते कृष्णा काठावर कितपत रूजणार ते उद्याच्या (गुरूवारी) निकालनंतरच स्पष्ट होईल. कृष्णाच्या जडणघडणीत पतंगराव कदम यांचे योगदान मोठे आहे. सोनसळ म्हणजे कृष्णाच्या कार्यक्षेत्रातीलच भाग. त्यामुळे कृष्णाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा आहेच. त्यामुळे तो सुर गवसण्यासाठी मंत्री विश्वजित कदम यांची एन्ट्री अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 

कृष्णाच्या निवडणुकीत अनेक राजकीय उलापालथी असतात. मोहिते-भोसले यांच्या मनोमिलनाला हरवून अविनाश मोहिते यांनी 2010 मध्ये विजश्री खेचून आणली होती. त्यामुळे त्या काळापासून कृष्णाकाठावर संस्थापक पॅनेल असा तिसरा पर्याय उभा राहिला आहे. त्यामुळे कृष्णाची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनवली. सत्ताधारी भोसले गटाच्या कारभारावरून त्यांना घेरण्याची व्यूव्ह रचना संस्थापक व रयत पॅनेल आखली. त्याचवेळी रयत संस्थापकवर व संस्थापक रयतवरही हल्ले करत होते. त्या सगळ्यात दोन्ही पॅनेल जवळचे असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री व जयंत पाटील यांनी यावेळी कोणतीही जाहीर भूमिका घेतली नाही.

राजकीय संवेदनशिल झालेल्या निवडणुकीत भोसले गटाला सहा वर्षाच्या कारभारवर आपण बाजी मारून नेवू असा ठाम विश्वास आहे. संस्थापक पॅनेलला अविनाश मोहिते यांच्यावर अन्याय झाल्यासह सत्ताधाऱ्यांच्या कारभावर सभासद नाराज असल्याने आम्हीच बाजी मारू असा विश्वास आहे. सभासदांच्या हिताचा कोणताही विचार सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही व संस्थापकमध्ये सभासदांचा विचार करावा, अशी ताकद नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीत बाजी मारणार असा रयत पॅनेलचा विश्वास आहे. त्या सगळ्या गोष्टी आजमीतीला सभासदांनी पेटीबंद केल्या आहेत. त्या उद्या (गुरूवारी) सगळ्यांसमोर उघड्या होतील. त्याचवेळी खरे कोणाचे पारडे जड आहे, याचा उलगडा होणार आहे.

टक्का वाढला; धक्का कोणाला.....

कृष्णाच्या 47 हजार 145 पैकी 10 हजार सभासद मृत आहेत. त्यामुळे 37 हजार 145 पैकी 34 हजार 532 मतदरांनी मतांचा हक्का बजावला आङे. त्यामळे मतदानाची टक्केवारी 91 टक्क्यांवर गेली आहे. मागील पंचवार्षिकला 79  टक्के मतदान झाले होते. यावेळी ते 12 टक्क्यांनी वाढला आहे. वाढलेला मताचा टक्का कोणाला फायद्याचा आहे, त्याची उकलही उद्या होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com