राजकारण तापलं; शिवसेनेचे महापौर खडसेंच्या भेटीला...

या भेटीत काय चर्चा होणार या बाबतही तर्क वितर्क लढविले जात आहेत.
 Eknath Khadse, Jayshree Mahajan .jpg
Eknath Khadse, Jayshree Mahajan .jpg

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महविकास आघाडीचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार असल्याचे महापालिकेतील शिवसेनेचे नेते सुनील महाजन (Sunil Mahajan) सांगितले आहे. (Jalgaon Shiv Sena Mayor Jayashree Mahajan will meet Eknath Khadse)

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता होती. मात्र २७ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे सत्तांतर होवून शिवसेनेची सत्ता आली. विशेष म्हणजे जळगाव महापालिकेत महापौर व विरोधी पक्षनेते शिवसेनेचे आहेत. महापौर जयश्री महाजन या आहेत तर त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत.

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन मंगळवारी जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेणार आहेत, या भेटीमुळे जळगाव शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीत काय चर्चा होणार या बाबतही तर्क वितर्क लढविले जात आहेत.

या बाबत विरोधी पक्षनेते नेते सुनील महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महापौर जयश्री महाजन व मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेणार आहोत, ते राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आहेत, महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात त्यांचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना भेटणे काय चुकीचे आहे.ते काय आता भाजपचे नेते नाहीत. राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, जळगावच्या विकासाबाबत त्यांचे आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com