वसईत तृतीयपंथियांच्या शिक्षणासाठी ट्रांसजेंडर शाळा; राज्यातील पहिलीच शाळा 

या शाळेला 'किन्नर विद्यालय' असे नाव देण्यात आले असून, आतापर्यंत 24 विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत.
Transgender schools for third party education in Vasai; The first school in the state
Transgender schools for third party education in Vasai; The first school in the state

विरार : शिक्षणाच्या प्रवाह पासून दूर असलेला समाज म्हणजे 'तृतीयपंथी' या तृतीयपंथी समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून समाजात स्थान मिळावे यासाठी या तृतीयपंथ्यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यांना अद्याप समाजाने स्थान दिलेले नाही. पण, पालघर जिल्ह्यातील वसई या भागात राज्यातील पहिली तृतीयपंथ्यांच्या शिक्षणासाठी ट्रांसजेंडर शाळा सुरू करण्यात आली आहे. या समाजाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम यामुळे होणार आहे. Transgender schools for third party education in Vasai; The first school in the state

शिक्षणाच्या प्रवाह पासून दूर असलेला समाज म्हणजे 'तृतीयपंथी' या तृतीयपंथी समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून समाजात स्थान मिळावे यासाठी या तृतीयपंथ्यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यांना अद्याप समाजाने स्थान दिलेले नाही. त्यांना प्रत्येक ठिकाणी भेदभाव आणि वेगळ्या नजरेने पाहिल्या जाते. मग तो माणूस असो महिला वर्ग दोन्हीही या तृतीयपंथ्यांना एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. त्यांना कमी समजले जाते.

या समाजातील लोकांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार मिळत नाही. त्यातूनच तृतीयपंथी समाज हा सुशिक्षित व्हावा यासाठी या समाजातर्फे आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता तृतीयपंथी समाजात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रात हा समाज आपली महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे.  आता या समाजाने एक पाऊल पुढे टाकले आहे. तृतीयपंथी समाज हा सुशिक्षित व्हावा यासाठी या समाजातर्फे  शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो अमलातही आणण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई या भागात राज्यातील पहिली तृतीयपंथियांच्या शिक्षणासाठी ट्रांसजेंडर शाळा सुरू करण्यात आली आहे. या समाजाबद्दल इतर समाजात पसरलेल्या भेदभाव दूर करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात मेहंदी अली आणि श्री महाशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या रेखा त्रिपाठी यांनी केली आहे. या शाळेला 'किन्नर विद्यालय' असे नाव देण्यात आले असून, आतापर्यंत 24 विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. मात्र शाळा सुरू होण्याचे आदेश मिळाल्यानंतर येथेही विद्यार्थ्यांना शिकावयास सुरुवात होणार आहे. 

विशेष म्हणजे या शाळेत शिकवणारे  सर्व शिक्षक हे सुद्धा तृतीयपंथीच आहे.  ही शाळा सुरू झाल्याने या समाजातील लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही पहिलीच शाळा असेल जिथे तृतीयपंथियांना  शिक्षण दिले जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या शाळेत शिक्षक देखील याच समाजाचे असून मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आहेत. त्यामुळे आता या समाजातील लोकांना शिक्षण घेता येणार ही एक सकारात्मक बाब आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com