नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविला!  - niti aayog ceo amitabh kant gets one year extension | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविला! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

 'मेक इंन इंडिया', स्टार्टअप इंडिया, इंक्रेडिबल इंडिया यासारख्या संकल्पना राबविण्यात अमिताभ कांत यांचे महत्वाचे योगदान आहे.

नवी दिल्ली :  नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांचा कार्यकाल एक वर्षासाठी केंद्र सरकारने वाढविला आहे. सरकारने तिसऱ्यांदा कांत यांचा कार्यकाळ वाढविला आहे. आता अमिताभ कांत हे जून २०२२ पर्यंत नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहतील. niti aayog ceo amitabh kant gets one year extension

केंद्र सरकारने याबाबत त्यांना पत्र दिले आहे. मंत्रीमंडळाने नियुक्ती केलेल्या समितीने अमिताभ कांत यांचा कार्यकाळ एका वर्षांसाठी वाढविण्यास मंजूरी दिली असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 

१९८०च्या बॅचचे आयएएस अधिकारी अमिताभ कांत यांनी केंद्र सरकारच्या राज्य आणि राष्ट्रीय विविध योजनांच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका बजावली आहे.  'मेक इंन इंडिया', स्टार्टअप इंडिया, इंक्रेडिबल इंडिया यासारख्या संकल्पना राबविण्यात अमिताभ कांत यांचे महत्वाचे योगदान आहे. केरळ कॅडरचे माजी सनदी अधिकारी असलेले  ६५ वर्षीय अमिताभ कांत यांना २०१६ मध्ये दोन वर्षांसाठी नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ जून २०१९ पर्यंत वाढविण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा जून २०२१ पर्यंत त्यांच्या कार्यकाळ वाढविण्यात आला होता. आता पुन्हा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे.  

मुंबई महापालिकेत मनसे-भाजप एकत्र येणार ?  

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभागांची रचना करताना भौगोलिक समानता राखण्यात येणार आहे. निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी प्रभागरचना करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक घटक पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मनसेबाबत अद्याप भाजपची भूमिका तळ्यातमळ्यात आहे. मुंबई महानगरपालिच्या २२७ जागांसाठी भाजपने कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी घेत ८२ जागा पटकावल्या होत्या. या कामगिरीची उजळणी करावयाची झाल्यास भाजपला घटक पक्षांसह मनसेला सोबत घ्यावे लागेल, असे मुंबई भाजपत बोलले जाते. 
 Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख