निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात, तर प्रशासनाची तयारी सुरू...

एकीकडे ओबीसी आरक्षणवरून राजकीय पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी अजूनही करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाने मात्र आपली तयारी केली असून निवडणुकीचा कार्यक्रम आखला आहे.
ZP election nag
ZP election nag

नागपूर : निर्धारित टक्केवारी ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court ओबीसींचे राजकीय आरक्षण OBC's Political Reservation रद्द ठरवले. त्यानंतर राज्यभरातील ओबीसी संघटना जाग्या झाल्या आणि राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका Zillha Parishad and Panchayat Samiti's Elections सहा महिने पुढे ढकलाव्या, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण जिल्हा प्रशासनाने मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

या निवडणुका होणार की नाही, याबाबत जनतेमध्ये मात्र संभ्रम कायम आहे. कारण ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, अशी गर्जना लोणावळा येथे झालेल्या ओबीसी चिंतन परिषदेत करण्यात आली आहे. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर येथपर्यंतही सांगितले की, जरी निवडणुक आयोगाने निवडणुकाची तयारी केली, तरीही आम्ही त्यांना कर्मचारीच उपलब्ध करून देणार नाही. मग कशी घेतील निवडणूक. येवढ्यावच वडेट्टीवार थांबले नाहीत, तर निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून कर्मचारी आणावे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे निवडणुका सध्या होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. पण जिल्हा प्रशासनाची तयारी पाहता निवडणूक होईल, असे दिसते. 

एकीकडे ओबीसी आरक्षणवरून राजकीय पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी अजूनही करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाने मात्र आपली तयारी केली असून निवडणुकीचा कार्यक्रम आखला आहे. नागपूर जिल्ह्यात 16 जिल्हापरिषद आणि 31 पंचायत समितीच्या पोट निवडणुका होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला कालपासून सुरवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यात 1115 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 6 लाख 16 हजार 016 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

3 लाख 17 हजार 292 पुरुष,  2 लाख 96हजार 721 महिला तर 3 इतरांचा समावेश आहे. आज पासून 5 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे तर 6 जुलै छाननी केली जाणार आहे. मतदान 19 जुलै ला तर मतमोजणी 20 जुलै ला होणार आहे. निवडून कोरोना नियम लक्षात घेऊन घेतली जाणार आहे.  बैठक साठी 50 लोकांना परवानगी असेल तर घरोघरी प्रचार करताना 5 जणांना एक ठिकाणी जाता येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांमध्ये आता कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com