मिरजेला दंगल नवीन नाही; प्रशासनाच्या निर्बंधाविरोधात आमदार सुरेश खाडेंचे वादग्रस्त वक्तव्य... - The riots are not new to Mirza; Controversial statement of MLA Suresh Khade against the restrictions of the administration ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मिरजेला दंगल नवीन नाही; प्रशासनाच्या निर्बंधाविरोधात आमदार सुरेश खाडेंचे वादग्रस्त वक्तव्य...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

गेले कित्येक दिवस व्यापारी दुकाने उघण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. पण लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही.

सांगली : जर आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले, तर वाद विकोपाला जाईल. मिरजेला दंगल काही नवीन नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी केले आहे. कडक निर्बंधाला विरोध दर्शवताना आमदार खाडे यांनी हे वक्तव्य केले आहे. The riots are not new to Mirza; Controversial statement of MLA Suresh Khade against the restrictions of the administration ...

आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. ते म्हणाले, कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासन, शासन निष्कामी झाले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून दुकाने उघडणार असा इशारा त्यांनी दिला आहे. सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. गेले कित्येक दिवस व्यापारी दुकाने उघण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. पण लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही.

हेही वाचा : अनिल देशमुखांची याचिका फेटाळली : सीबीआयसमोर आता जावे लागणार

दोन वेळा निर्बंध डावलून दुकाने उघण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला. पण पोलिस व महापालिका पथकाच्या भीतीने दुकाने पुन्हा बंद केली. आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. ते म्हणाले, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निष्क्रिय ठरले आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी  दुकाने उघडल्यानंतर कारवाई केली तर मिरजेसाठी दंगल नवीन नाही. पुन्हा दंगल घडेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

आवश्य वाचा : ऑक्सिजन अभावी मृत्यूची स्वतंत्र नोंदच नाही, राजकारण तापले...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख