ऑक्सिजन अभावी मृत्यूची स्वतंत्र नोंदच नाही, राजकारण तापले... - there is no seprate record of death due to lack of oxygen politics is hot | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

ऑक्सिजन अभावी मृत्यूची स्वतंत्र नोंदच नाही, राजकारण तापले...

निलेश डोये 
गुरुवार, 22 जुलै 2021

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात बळींची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४.९२ लाख ७८६ वर पोहोचली आहे. एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ लाख ३९२ वर पोहोचली.

नागपूर : कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाच नाही, असे केंद्र सरकारने Central Government म्हटल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला. राजकारण ढवळून निघाले. वास्तविक पाहता ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आणि खाटा उपलब्ध नसल्यामुळे अनेक मृत्यू झाल्याचे लोकांना आपल्या डोळ्यांनी बघितले. पण प्रशासनाकडे याची स्वतंत्र नोंदच नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. There is no seprate record of death due to lack of oxygen.

ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचे मृत्यू झाल्याची माहिती नाही. आता ती माहिती घ्यावी लागेल. असे जिल्हाधिकारी डॉ. विमला आर. यांनी म्हटले आहे. तर ऑक्सिजनअभावी कुणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे तशी नोंदही कुठे नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे ज्यांचे नातेवाईक कोरोनाने ऑक्सिजनअभावी दगावले, त्या लोकांमध्ये संतापाची लाट आली आहे. 

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाट आल्या असून दुसरी लाट अधिक तीव्र होती, असे सांगण्यात येते. मार्च, एप्रिल महिन्यात दुसरी लाट होती. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजनसाठी मोठी मेहनत प्रशासनाला घ्यावी लागली. योग्य उपचार तसेच ऑक्सिजन व खाट वेळेत न मिळाल्याने कोरोना रुग्णांचे मृत्यू झाल्याचे आरोप झालेत. जिल्ह्यात आजवर १०,११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यांपैकी १६२१ जण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील असून, ५८९१ शहरातील तर २६०३ हे नागपूर ग्रामीणमधील आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात बळींची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४.९२ लाख ७८६ वर पोहोचली आहे. एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ लाख ३९२ वर पोहोचली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्क्यांवर आले आहे. सध्यस्थितीत शहरात २१८, ग्रामीणमध्ये ५४ तर जिल्ह्याबाहेरील ७ असे २७९ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे रुग्ण दगावल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. परंतु ऑक्सिजन अभावी व खाटा न मिळाल्याने मृत्यू झाल्याची स्वतंत्र नोंद नाही. 

हेही वाचा : महाराष्ट्राचा लसीकरणाचा नवा विक्रम, चार कोटींचा टप्पा केला पार…

ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याबाबतची माहिती सध्या नाही. ती घ्यावी लागेल. 
- विमला आर., जिल्हाधिकारी. 

ऑक्सिजनचे नियोजन करण्यात आले. त्याचा पुरवठाही योग्यप्रकारे करण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कुणाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे तशी नोंद नाही. 
- योगेश कुंभेजकर, सीईओ, जि.प.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख