तिसऱ्या लाटेत मुले बाधित होण्याचा अंदाज, तत्काळ आरोग्यसेवेसाठी नियोजन करा....  - Predict that children will be affected in the third wave, plan for immediate health care Says Ramraje Naik Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

तिसऱ्या लाटेत मुले बाधित होण्याचा अंदाज, तत्काळ आरोग्यसेवेसाठी नियोजन करा.... 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

पंधरा ते 40 वयोगटात कोरोनाबाधित अधिक प्रमाणात आढळत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण जास्त आहेत. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढविले पाहिजेत. असे सांगून श्री. निंबाळकर म्हणाले, "ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी वैद्यकीय सेवांचे विकेंद्रीकरण करा.

सातारा : कोरोना संसर्गाच्या (Corona pendamic) तिसऱ्या लाटेत (Third Wave) लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या अंदाजानुसार लहान मुलांना तत्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आतापासूनच नियोजन करा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केल्या. (Predict that children will be affected in the third wave, plan for immediate health care Says Ramraje Naik Nimbalkar)

(कै.) यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सभापती निंबाळकर यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी विविध सूचना केल्या. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. 

हेही वाचा : आपत्तीत राजकारण करण्यात स्वारस्य नाही : देवेंद्र फडणवीस

पंधरा ते 40 वयोगटात कोरोनाबाधित अधिक प्रमाणात आढळत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण जास्त आहेत. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढविले पाहिजेत. असे सांगून श्री. निंबाळकर म्हणाले, "ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी वैद्यकीय सेवांचे विकेंद्रीकरण करा. एखाद्या रुग्णामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. यामुळे गृह विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा.'' 

आवश्य वाचा : साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे या बैठकीत दिली. या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार भोसले, आमदार पाटील, आमदार शिंदे यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख