'साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा'  - pome of Parul Kakkad criticizing the government goes viral | Politics Marathi News - Sarkarnama

'साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा' 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

पारुल कक्कड यांनी एक कविता लिहीली आहे. ती कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 
 

मुंबई : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट (Corona second wave) आली असून, कोरोना संकटाच्या हाताळणीत मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका देशात तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच गंगा नदी किनारी हजारो मृतदेह पुरल्याचे तसेच अनेक मृतदेह गंगेत सोडून दिल्याचे वास्तव समोर आल्यानंतर उतर प्रदेश आणि केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. गुजराती कवयित्री पारुल कक्कड (Parul Khakkar) यांनी एक कविता लिहीली आहे. ती कविता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे. (Criticism of Narendra Modi through poetry; Parul Kakkad's poem goes viral) 

हे ही वाचा : गंगेत मृतदेह ; मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

कक्कड यांनी या कवितेच्या माध्यमातून देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी ()सरकार अपयशी ठरल्यांचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गुजरातमधील कोरोना परिस्थिती आणि उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत सोडण्यात आलेल्या मृतदेहावरुन त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या कवयित्री आधी भाजपच्या समर्थक म्हणून ओळखळ्या जात होत्या मात्र, या कवितेनंतर त्यांना भाजपच्या आयटी सेलकडून ट्रोल केले जात आहे. 

हे ही वाचा : दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारु नका..''राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा...

त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या त्यांच्या या कवितेवर २८ हजाराहून जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. कालपर्यंत पारूलजींना गुजरातमध्ये फक्त त्यांनी लिहिलेल्या भजनासाठीच ओळखले जात होते. मात्र, त्यांची ही कविता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.  

 'नंगा साहेब' 
 
एक साथ सब मुर्दे बोले ‘सब कुछ चंगा-चंगा’
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

ख़त्म हुए शमशान तुम्हारे, ख़त्म काष्ठ की बोरी
थके हमारे कंधे सारे, आँखें रह गई कोरी
दर-दर जाकर यमदूत खेले
मौत का नाच बेढंगा

साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

नित लगातार जलती चिताएँ
राहत माँगे पलभर
नित लगातार टूटे चूड़ियाँ
कुटती छाति घर घर
देख लपटों को फ़िडल बजाते वाह रे ‘बिल्ला-रंगा’

साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा

साहेब तुम्हारे दिव्य वस्त्र, दैदीप्य तुम्हारी ज्योति
काश असलियत लोग समझते, हो तुम पत्थर, ना मोती
हो हिम्मत तो आके बोलो
‘मेरा साहेब नंगा’

साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा.... 

मूळ गुजराती कवयित्री: पारुल कक्कड 
हिंदी भाषांतर : इलियास मन्सूरी 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख