आपत्तीत राजकारण करण्यात स्वारस्य नाही : देवेंद्र फडणवीस  - Not interested in disaster politics: Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

आपत्तीत राजकारण करण्यात स्वारस्य नाही : देवेंद्र फडणवीस 

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 18 मे 2021

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी लासूर स्टेशन येथे उभारलेल्या अद्ययावत कोविड सेंटरला फडणवीस यांनी काल भेट दिली.

शिर्डी : "कोविड संकटात जनतेला धीर देण्यासाठी आपण राज्यभर फिरतो. या आपत्तीत राजकारण किंवा टीका-टिप्पणी करण्यात मला स्वारस्य नाही. प्रत्यक्ष परिस्थिती पाहून राज्य सरकारला सूचना करण्यावर माझा भर असतो,'' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devindra Fadnavis) यांनी बोलताना व्यक्त केली. (Not interested in disaster politics: Devendra Fadnavis)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, "ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही; सर्वांनी एकत्र येऊन काम करावे,' असे विधान केले.

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी लासूर स्टेशन येथे उभारलेल्या अद्ययावत कोविड सेंटरला फडणवीस यांनी काल भेट दिली. त्यानंतर ते माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पुढाकारातून कोपरगाव येथे उभारलेल्या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी निघाले. या प्रवासात त्यांच्या सोबत असलेले भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी फोनद्वारे त्यांच्याशी संवाद घडवून आणला, त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी झालेली प्रश्नोत्तरे अशी : 

प्रश्न ः कोविड आपत्तीच्या काळात महाराष्ट्र पालथा घालीत लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेणारे, त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपड करणारे आपण एकमेव नेते आहात. सध्याच्या कोविड लाटेबाबत आपले काय निरीक्षण आहे? 

फडणवीस : राज्यभरात कोविडची लाट स्थिरावते आहे. काही दिवसांत उतार अपेक्षित आहे. मात्र, आता लगेचच तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी सुरू करावी लागेल. त्यात लहान मुलांवरील उपचाराची विशेष व्यवस्था करावी लागेल. 

हेही वाचा...

निळवंड्याचे पाणी आणणार

प्रश्न ः पंतप्रधान निधीतून राज्यात दिलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त झाल्याने पडून असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. 

फडणवीस ः केंद्र सरकारने महाराष्ट्राला सुमारे पाच हजार व्हेंटिलेटर दिले. पहिल्या लाटेत व्हेंटिलेटरची मागणी अचानक वाढली. परदेशांतही तुटवडा होता. युद्धपातळीवर त्यांची निर्मिती झाली. त्यांची रचना काहीशी गुंतागुंतीची आहे. आपण ते गोदामात थप्पी लावून ठेवले तर कसे होणार? तरीही राज्यभरातील नव्वद टक्के व्हेंटिलेटर व्यवस्थित सुरू आहेत. दहा टक्के नादुरुस्त असले तरी दुरुस्तीसाठी इंजिनिअर पाठविले आहेत. या विषयावरून राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख