बँकावरील निर्बंधाच्या संदर्भात पवारांची मोदींशी भेट; ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते...

सहकारी क्षेत्र महाराष्ट व गुजरातमध्ये भक्कमपणे उभे राहिले, त्या बँकांना निर्बंधात आणण्याचे काम केले आहे. हे निर्बंध कमी करावेत, यासाठी पवार साहेब आज मोदींना भेटले आहेत.
Pawar's visit to Modi regarding bank restrictions; ED acts on the advice of Chandrakant Dada
Pawar's visit to Modi regarding bank restrictions; ED acts on the advice of Chandrakant Dada

सोलापूर : सहकारी क्षेत्र महाराष्ट्र व गुजरातमध्ये भक्कमपणे उभे राहिलेले आहे. या बँकांना निर्बंधात आणण्याचे काम केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या मदतीने केले आहे. हे निर्बंध कमी करावेत, यासाठी खासदार शरद पवार साहेब आज मोदींना भेटले आहेत, असे स्पष्ट करून ईडीही चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागत आहे, हे अनेकवेळा निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती झालय सरकार पाडण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते ही लोकं करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. Pawar's visit to Modi regarding bank restrictions; ED acts on the advice of Chandrakant Dada

राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज सोलापुरात होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शरद पवार यांच्या दिल्ली भेटीच्या संदर्भातील नेमकी माहिती दिली.  जयंत पाटील म्हणाले, देशातील विविध क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील लोकांनी निवेदने पाठवली व भेटली. या सगळ्यांचे मध्ये लक्ष घालून रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना केल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेब मोदींना भेटायला गेले होते.

पवार साहेबांनी राष्ट्रीय प्रश्नावर संरक्षण मंत्र्यांना भेटायला गेले. देशाच्या संरक्षणासंदर्भात त्यांनी चर्चा केली असेल. हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधानांची वेळ मागीतली असून या प्रश्नांसाठी मी त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ते भेटले आहेत. देशातील नागरी अर्बन बँका व सहकारी बँका आहेत, त्यांच्यावर काही निर्बंध रिझर्व्ह बँकेन आणले आहेत. या निर्बंधामुळे सहकारी क्षेत्रातील बँकांचे संचालक मंडळ व कार्यकारी संचालक व त्यावर आणखी एक मंडळ जे सल्ला देईल, अशी वेगळी रचना रिझर्व्ह बँकेने केली आहे.

नाबार्डचे बंधन या बँकावर होते. हे बंधन केंद्राने काढून रिझर्व्ह बँकेचे बंधन टाकले आहे. देशातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका सर्वसामान्यंना दाद देत नाहीत. सहकारी क्षेत्र महाराष्ट व गुजरातमध्ये भक्कमपणे उभे राहिले, त्या बँकांना निर्बंधात आणण्याचे काम केले आहे. हे निर्बंध कमी करावेत, यासाठी पवार साहेब आज मोदींना भेटले आहेत. हीच मागणी त्यांनी केलेली आहे. 

ईडीच्या संदर्भात प्रश्न विचारला असता ईडीही चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागत आहे, हे अनेकवेळा निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. सरकार पाडण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते हे लोकं करत असतात.ईडी व सीबीआय ही विरोधी पक्षांशी सल्ला मसलत करून कारवाई करतात हे अत्यंत दुर्देवी आहे, असा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com