पिंपरीच्या महापौरांची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार  - Complaint of Pimpri Mayor to Deputy Chief Minister Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

पिंपरीच्या महापौरांची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जुलै 2021

पिंपरीला कमी लसपुरवठा होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

पिंपरी : पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडला कमी लस पुरवठा होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा येत असल्याची तक्रार पिंपरीच्या Pimpri महापौर माई ढोरे Mai Dhore यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे  केली. 

पुणे येथील जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत ढोरेंनी ही तक्रार केली. पिंपरी चिंचवड शहराने कोरोनामुक्तीचा संकल्प केला असून त्यासाठी लसीकरणावर विशेष भर दिला आहे. मात्र तथापी अपु-या लसीच्या पुरवठ्यामुळे लसीकरणात वारंवार अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे शहराला पुरेसा लसीचा पुरवठा करण्याची विनंती ढोरेंनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.पुण्याच्या तुलनेत पिंपरीला कमी लसपुरवठा होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

लसीकरण केल्याने कोरोना रुग्णांची संख्या घटली असल्याचे त्यांनी सांगितले.आता कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.त्यामुळे शहर कोरोनामुक्त करण्यासाठी पुरेसा लस पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ती रास्त असल्याचे सांगत त्याबाबत कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

''पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकाने उघडता येतील. शनिवार, रविवारी वीकेंडला अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहतील, '' असे अजित पवार यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख