'राष्ट्रवादी' च्या जयंत पाटलांनी दिली भाजपच्या गडकरींना 'हाय वे मॅन' ची उपाधी - NCP's Jayant Patil gives Gadkari the title of 'Highway Man' | Politics Marathi News - Sarkarnama

'राष्ट्रवादी' च्या जयंत पाटलांनी दिली भाजपच्या गडकरींना 'हाय वे मॅन' ची उपाधी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 मे 2021

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून देशभरात चांगले महामार्ग निर्माण केले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जलद गतीने वाहतूक झाली आहे. त्यांच्या कामाचे आज देशभरात कौतुक होत आहे.

जळगाव : राजकारणात पक्ष वेगळे असले तरी चांगल्या कामाचे कौतुक करणे, एकमेकांना शुभेच्छा देणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आज भाजप (BJP) नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत 'हाय वे मॅन' ची (Highway Man) उपाधी ट्विट करून दिली आहे. NCP's Jayant Patil gives Gadkari the title of 'Highway Man'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून देशभरात चांगले महामार्ग निर्माण केले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जलद गतीने वाहतूक झाली आहे. त्यांच्या कामाचे आज देशभरात कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही गडकरी यांच्या याच कामाचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय : म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी पाच कंपन्यांना परवाना

 जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटर वर नितीन गडकरी सोबतचा एक फोटो टाकला आहे. वाढदिवसानिमित्त गडकरी यांना दिलेल्या शुभेच्छांमध्ये जयंत पाटील म्हणतात, आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी नवनवीन विकासाभिमुख प्रकल्प राबविणारे विकासाचे भ्रम उभा न करता खऱ्या अर्थाने विकासकामे पार पडणारे देशाचे 'हाय वे मॅन' श्री. नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

आवश्य वाचा : शरद पवार यांचा या सरकारला मनापासून पूर्ण आशीर्वाद!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख