शरद पवार यांचा 'या' सरकारला मनापासून पूर्ण आशीर्वाद! 

असे तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का, अफवांवर विश्वास ठेवू नका?
  Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sanjay Raut .jpg
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sanjay Raut .jpg

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी, अशा मंत्रिमंडळातील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. त्यावर शिवसेना खासदरा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  (Sanjay Raut reacted to the meeting between Sharad Pawar and Uddhav Thackeray)

राष्ट्रवादीच्या पुढाकाराने राज्यात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकविणे ही केवळ शिवसेनेची जबाबदारी नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांच्या ध्यानात आणून दिल्याचे सांगण्यात येत होते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ''असे तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का, अफवांवर विश्वास ठेवू नका? अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते, त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. 

महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, (Maratha reservation) पदोन्नती आरक्षण, कोरोना, लसीकरण असे अनेक विषय आहेत, त्यावर चर्चा झाली. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या नाराजी संदर्भातील कोणत्याही चर्चा नाहीत. शरद पवार यांचा या सरकारला मनापासून पूर्ण आशीर्वाद, असल्याचे राऊत यांनी सांगितले.    

दरम्यान, आजारपणानंतर शरद पवारांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची पहिल्यादांच भेट घेतली होती. दोनही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. ही नियमित भेट असली तरी राज्यातील गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्यावर सध्या संकटांची मालिका सुरूच आहे. कोरोना संसर्गाशी लढा सुरू असताना नुकतेच तौते  राज्याला मोठा तडाखा दिला. मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. 

त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने (Congress) पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, असा हट्ट सरकारकडे धरला आहे. सरकारची कोंडी करणाऱ्या या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन पवार पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. आपले प्रश्न घेऊन विविध शिष्टमंडळेही पवार यांना भेटत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com