यासाठी उदयनराजे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट - MP Udayanraje will meet Prime Minister Narendra Modi for Smart Satara .... | Politics Marathi News - Sarkarnama

यासाठी उदयनराजे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

स्मार्ट सिटीसाठी अनेक नवनवीन स्मार्ट संकल्पना आणि उपक्रम राबवावे लागतील. या संकल्‍पनांचा फायदा सर्वसामान्‍यांना होईल. साताऱ्याचा समावेश स्‍मार्ट सिटीत व्‍हावा, याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून विशेष विनंती करणार आहोत.

सातारा : सातारा शहराचा केंद्राच्‍या 'स्मार्ट सिटी' योजनेत समावेश होण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना भेटणार असून, त्‍याबाबत या कार्यालयाशी चर्चा झाली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. MP Udayanraje will meet Prime Minister Narendra Modi for Smart Satara ....

पत्रकात उदयनराजेंनी म्‍हटले की, सातारा जिल्ह्यातील शहरे स्मार्ट बनविण्‍यासाठी आम्ही आग्रही आहोत. केंद्राच्‍या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक गावे ओडीएफ आणि ओडीएफ प्लस होत आहेत. स्मार्ट सिटीसाठी अनेक नवनवीन स्मार्ट संकल्पना आणि उपक्रम राबवावे लागतील. या संकल्‍पनांचा फायदा सर्वसामान्‍यांना होईल. साताऱ्याचा समावेश स्‍मार्ट सिटीत व्‍हावा, याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून विशेष विनंती करणार आहोत.

हेही वाचा : दिल्लीत ठाकरे-मोदी भेट झाली, अन् देसाईंकडून स्वबळाची घोषणा..

साताऱ्यावर मोदी यांचे विशेष प्रेम असल्‍याचेही त्‍यांनी पत्रकात नमूद केले आहे. जिल्ह्यात अकरा धरणे असून, अनेक ठिकाणी छोटेमोठे बंधारे, के. टी. वेअर आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे पश्‍चिम भाग अतिवृष्टीचा आणि पूर्वभाग अवर्षणग्रस्त आहे. याचा विचार करून, 'पॉटेबल वॉटर'चा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प साताऱ्या‍त राबविण्यात येणार आहे. त्‍यासाठी केंद्रीय जलशक्तिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन तसा प्रस्‍तावही त्‍यांना देणार असल्‍याचेही उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

आवश्य वाचा : यंग ब्रिगेडमधील गळती अन् काँग्रेसने उत्तर प्रदेशात गमावला ब्राह्मण चेहरा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख