दिल्लीत ठाकरे-मोदी भेट झाली, अन् देसाईंकडून स्वबळाची घोषणा..

महाविकास आघाडीतील कुरबुरी, राजकीय वातावरण आणि त्यात ठाकरे-मोदी या दोन नेत्यांमध्ये झालेली वैयक्तिक चर्चा त्यामुळेच चर्चेचा विषय ठरत आहे.
Pm Modi-Cm Thackeray-Subhash Desai News Aurangabad
Pm Modi-Cm Thackeray-Subhash Desai News Aurangabad

औरंगाबाद ः शिवसेनेतील ज्येष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शिवसेनेच्या ३६ व्या वर्धापनदिनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. (Thackeray-Modi meeting in Delhi, self-declaration by subhash desai)  राज्यात तीन पक्षांचे सरकार असतांना त्यांनी केलेल्या स्वबळाच्या घोषणेचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

विशेष म्हणजे दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आधी राज्यातील विविध विषयांवर चर्चा आणि त्यानंतर अर्धा तास वैयक्कित भेट. (In Delhi, Chief Minister Uddhav Thackeray called on Prime Minister Modi.) या भेटीनंतर राज्यात अनेक तर्कवितर्क लढवले जात असतांनाच सायंकाळी शिवसैनिकांच्या व्हर्च्युल मेळाव्यात देसाई यांनी शिवसैनिकांना भगवाच फडकवायचा, असे आदेश दिले. ठाकरे-मोदी भेटीच्या काही तासांतच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

शिवसेनेते पहिल्या फळीतले जे महत्वाचे, विश्वासू आणि बाळासाहेबांपासूनचे सहकारी आहेत, त्यात सर्वात वरच्या क्रमांकावर असलेले( Minister Subhash Desai) सुभाष देसाई यांनी टायमिंग साधत केलेल्या या विधानाची सध्या चर्चा होते आहे. राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी-काॅंग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार तर दुसरीकडे विरोधकाच्या भूमिकेत भाजप आहे. सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप व त्यांचे नेते सोडत नाहीयेत. तर दुसरीकडे सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

राज्यात दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय विचाराधीन असतांना काॅंग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांनी परस्पर घोषणा केल्याने मुख्यमंत्री नाराज झाल्याची चर्चा होती. तर काॅंग्रेसला निर्णय प्रकियेत सहभागी करून घेतले जात नाही, असा सूर अधूनमधून काॅंग्रेसकडून निघत असतो. (A few days ago, the Chief Minister and NCP President Sharad Pawar met) तर काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली त्यात देखील सरकारमधील कुरबुरीवर चर्चा झाल्याचे बोलले गेले. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मंत्री मुख्य्मंत्र्यांशी नीट वागत नाहीत, असा आरोप देखील मुख्यमंत्र्यांकडून या भेटीत केला गेला, अशी देखील चर्चा होती.

वैयक्तिक भेटीचा इफेक्ट..

या सगळ्या वातावरणात राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षण, मागसर्वगीय पदोन्नत्या, जीसएटी, पीक विमा व अन्य विषय घेऊन उद्धव ठाकरे, अजित पवार व अशोक चव्हाण हे सरकारमधील तीन प्रमुख मंत्री दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटले. राज्यातील विषयांवर चर्चा झाल्यानंतर ठाकरे-मोदी यांच्यात अर्धातास वैयक्तिक चर्चा देखील झाल्याचे सांगितले जाते. ठाकरे यांनी देखील याला दुजोरा देत आमचे वैयक्तिक संबध चांगले असल्याचे पत्रकारांना ठणकावून सांगितले.

महाविकास आघाडीतील कुरबुरी, राजकीय वातावरण आणि त्यात ठाकरे-मोदी या दोन नेत्यांमध्ये झालेली वैयक्तिक चर्चा त्यामुळेच चर्चेचा विषय ठरत आहे. मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या औरंगाबादमधील शिवसेना शाखेला ८ जून रोजी ३६ वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी व्हर्च्यूल पद्धतीने मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच खरतंर संवाद साधणार होते, पण दिल्ली दौऱ्यांमुळे ही जबाबदारी देसाईवर आली.

मराठवाड्यात शिवसेनेने काय केले हे सांगत असतांनाच राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कशी विकासकामे होत आहेत, जनतेचा त्यांच्यावर कसा विश्वास आहे, हे देसाई यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे सहा व विधान परिषदेत एक असे सात आमदार निवडून आले. याचा दाखला देतांनाच यापुढील महापालिका, जिल्हा परिषदा व सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचे आवाहन देसाई यांनी या मेळाव्यात केले.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तीनही पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रत्येक निवडणुकीत आघाडीकरून एकत्रित लढायचे आणि राज्याचा पॅटर्न राबवयाचा असे धोरण आखले होते. हा प्रयोग काही निवडणुकांमध्ये यशस्वी देखील झाला. भाजपला रोखणे हा प्रमुख उद्देश या मागे होता. परंतु मोदी-ठाकरे भेटीनंतर शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतल्याचे देसाई यांच्या स्वबळाच्या घोषणेवरून स्पष्ट होते.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in