ठाकरे-मोदींच्या भेटीवर उदयनराजे म्हणतात, देवाण घेवाण होऊन सत्तांतर होणार.... - On the meeting between Thackeray and Modi, Udayanraje says, This is a political compromise, | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

ठाकरे-मोदींच्या भेटीवर उदयनराजे म्हणतात, देवाण घेवाण होऊन सत्तांतर होणार....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

आजच्या बैठकीनंतर काही राजकिय घडामोडी घडतील का, याप्रश्नावर उदयनराजे म्हणाले, होतील का नाही ते त्यांनाच विचारा, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. अलिकडे तुमचे अंदाज खरे होतात, असे विचारले असता ते म्हणाले, अंदाज बांधण्याइतके माझे कधी वय होणार नाही. पण मी अजून १६ वर्षाचा आहे. या लोकांनी समाजाची मानसिक अवस्था अशी करून ठेवलीय, आता कशाचा अंदाजच बांधता येत नाही.

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav THackeray व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje Bhosale यांनी राज्य सरकारची खिल्ली उडवली. या भेटीतून काय होणार...आरक्षण प्रश्नावर आपण एकत्र येऊया, असे म्हणत पुन्हा सत्तांतरच होणार ना. ही राजकिय तडजोड आहे, असेही त्यांनी नमुद केले. On the meeting between Thackeray and Modi, Udayanraje says, This is a political compromise,

सातारा पालिकेच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. मराठा आरक्षण प्रश्नावर मी राज्य सरकारला श्वेत पत्रिका काढा, अशी मागणी केली होती. या मागणीवर अद्यापही त्यांनी काहीही केलेले नाही. आज मोदींना पंतप्रधान नात्याने तुम्ही भेटायला जायच्या आधी तुम्ही विशेष अधिवेशन बोलवायला हवे होते. त्यामध्ये चर्चा करून मगच भेटायला हवे होते.

हेही वाचा : पिक विम्यात मॉडेल ठरलेल्या बीडच्या शेतकऱ्यांची पुन्हा फरफट..

पण, हे जाऊन भेटणार काय बोलणार.. राजकिय तडजोड.... आम्ही आरक्षण प्रश्नावर असे करतो, आपण एकत्र येऊ या. मग परत सत्तांतर होणार ना. यातूनच घेवाण देवाणच होणार, महाराष्ट्रात सध्या अनेक प्रकरणे चालली आहेत. कोण मजल्यावरून पडतंय, कोण कोणाच्या पक्षात जातंय, कोणाच्या गाडीत हे सापडतंय कोणाच्या गाडी ते सापडतंय...काही तरी होईल, असे आपल्या सर्वांना वाटत असते. मात्र, हे एकत्र येऊ या, आपले लग्न पुन्हा लावूया आणि समाजाला शांत करू या. शांत म्हणजे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे.

आवश्य वाचा : ठाकरे - मोदी भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

आरक्षणाची आग लोकांच्या मनात इतकी भडकलेली आहे की, मुस्लिमांना पुरा आणि हिंदूंना जाळा एवढेच बाकी राहिले आहे. आजच्या बैठकीनंतर काही राजकिय घडामोडी घडतील का, याप्रश्नावर उदयनराजे म्हणाले, होतील का नाही ते त्यांनाच विचारा, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. अलिकडे तुमचे अंदाज खरे होतात, असे विचारले असता ते म्हणाले, अंदाज बांधण्याइतके माझे कधी वय होणार नाही. पण मी अजून १६ वर्षाचा आहे. या लोकांनी समाजाची मानसिक अवस्था अशी करून ठेवलीय, आता कशाचा अंदाजच बांधता येत नाही. समाजात मीही आलोच. काय चाललंय हेच समजत नाही. एक डाव भूताचा असे चालले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख