पिक विम्यात मॉडेल ठरलेल्या बीडच्या शेतकऱ्यांची पुन्हा फरफट.. - The re-emergence of Beed farmers as a model in crop insurance | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

पिक विम्यात मॉडेल ठरलेल्या बीडच्या शेतकऱ्यांची पुन्हा फरफट..

दत्ता देशमुख
मंगळवार, 8 जून 2021

२०१६ - १७ आणि २०१७ - १८ या आर्थिक वर्षात पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीबद्दल जिल्ह्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव झाला होता.

बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीत देशात पहिला क्रमांक पटावणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नंतरच्या काळात कंपन्यांकडून फसवणूक आणि फरफटच सुरु आहे. आता बीडच्या पिक विमा बद्दल मॉडेल म्हणून गौरव केला जात असला तरी शेतकरी विमा मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. (The re-emergence of Beed farmers as a model in crop insurance) पंतप्रधान पीक विमा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्काराने दोन वर्षांपूर्वी दिल्लीत गौरविण्यात आले होते.

प्रधानमंत्री पिकविमा योजना केंद्रातील मोदी सरकारने सुरु केली व नव्या योजनेला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्हयातील शेतकऱ्यांचा विमा भरण्याकडे सकारात्मक कल आहे. (Farmers in Beed district have a positive attitude towards insurance.) शिवाय शेतकऱ्यांनी या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ - १७ आणि सन २०१७ - १८ मध्ये केलेल्या उत्कृष्ट  अंमलबजावणीबद्दल प्रधानमंत्री उत्कृष्ट लोक प्रशासन हा गौरव जिल्ह्याने मिळविला.

सन २०१६ च्या खरीप हंगामात १३ लाख ५४ हजार ४९६ शेतकरी सहभागी झाले होते. सहा लाख ३३ हजार २८६ विमा संरक्षण क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. यासाठी ५५४६.०२ लक्ष रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता. (1 lakh 61 thousand 74 farmers had participated in this season.) सहा लाख २४९ लाभार्थ्यांना २३२८४.४१ लाख विमा मंजूर झाला. तसेच रब्बी हंगामात १ लाख ६१ हजार ७४ शेतकरी सहभागी झाले होते.

९९ हजार ४१ विमा संरक्षित क्षेत्रासाठी २६२.५७ लाख रुपये हप्ता भरण्यात आला होता. ७ हजार १२९ लाभार्थ्यांना ४०५.०४ लाख रुपये विमा मंजूर झाला. अशा प्रकारे एकूण १५ लाख १५ हजार ५७० सहभागी शेतकऱ्यांनी ७ लाख ३२ हजार ३२७ विमा संरक्षित क्षेत्र करण्यासाठी ५८०८.५९ विमा हप्ता भरला होता. ६ लाख ७ हजार ३७८ लाभार्थी शेतकऱ्यांना २३६८९.४५ एवढा विमा मंजूर झाला. 

ऐंशी टक्के शेतकऱ्यांना विमा कवच..

प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१७-१८ च्या खरीप आणि रब्बी हंगामात एकूण १६ लाख ३० हजार ४९१ शेतकरी सहभागी झाले होते. ७ लाख ३२ हजार २९३ विमा संरक्षीत क्षेत्रासाठी ७१६५.४५ विमा हप्ता भरलेला होता. या वर्षात  ३२४० लाभार्थ्यांना ३४९.०३ विमा मंजूर झाला. तब्बल बारा लाख अर्ज वेगवेगळ्या पिकासाठी शेतकऱ्यांचे दाखल झाले होते. खरीप पिकविम्यापोटी  जिल्ह्यात ५८ कोटी रुपये शेतकऱ्यांनी विमा हफ्ता भरला होता. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांची पिके या योजनेखाली  विमा संरक्षित झाली होती.

त्यावेळी जिल्हा पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात पहिल्या क्रमांकावर आणि नंतर देशात पहिला येण्याचा मान बीडने पटकावला. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकानेही बीडचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी बँका सुरु ठेवून विमा हफ्ता भरून घेतला होता. व्हाट्सएपच्या ग्रुप मधून माहिती शेतकऱ्यापर्यंत देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत रेकॉर्डब्रेक यश आले आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना लक्षात आला. 

बीड पॅटर्न पोहचला कर्नाटकात..

जिल्ह्यातील या पिकविमा पॅटर्नची माहिती राज्याच्या बाहेर आधीच पोचली आहे. केंद्राच्या पथक येण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील पिकविमा योजनेत असलेला शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणातील सहभागाचा लौकिक  यापूर्वी शेजारील कर्नाटक राज्यात पोचला. कर्नाटक सरकारनेही जिल्हा प्रशासनाकडून याची माहिती घेतली. दरम्यान, जिल्ह्याचा असा पॅटर्न असताना आणि देश पातळीवर गौरव झालेला असताना दोन वर्षांत मात्र शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड होत आहे.

शेतकऱ्यांनी विमा संरक्षणासाठी भरलेले कोट्यावधी आणि सरकारने वाट्याचे भरलेले शेकडो कोटी कंपनीच्या तिजोरीत जाताहेत पण शेतकऱ्यांच्या हाती वटाण्याचा अक्षता पडत आहे. यंदाही मागच्या दोन हंगामातील पिक विम्यासाठी शेतकरी वाट पाहत आहेत.

हे ही वाचा ः आजच्याच दिवशी स्थापन झाली होती मराठवाड्यातली पहिली शिवसेनेची शाखा..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख