मकरंद पाटलांनी सांगितले अन्‌ शरद पवारांनी थेट 'सिरम'च्या संचालकांना केला फोन - Makrand Patil said that Sharad Pawar called the director of Siram directly | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मकरंद पाटलांनी सांगितले अन्‌ शरद पवारांनी थेट 'सिरम'च्या संचालकांना केला फोन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 जून 2021

यावर शरद पवार साहेबांनी सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शुक्रवारी (ता. 4) आपल्याला हडपसर येथे भेटायला बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किती व्हॅक्‍सिन वायल उपलब्ध होतात, हे पाहून खंडाळा, महाबळेश्वर व वाई तालुक्‍यांतील लोकांसाठी विशेषतः विविध इंडस्ट्रीमधील कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे आमदार पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

वाई : आमदार मकरंद पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी खंडाळा, वाई व महाबळेश्वर या तीन तालुक्‍यांतील लोकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी कोरोनावरील व्हॅक्‍सिन उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता आणि ग्रामीण भागातील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. याबाबतकाही कंपन्यांचे व्यवस्थापन आणि महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी व्हॅक्‍सिनसाठी निधी देण्याचे मान्य केले. त्यामुळे व्हॅक्‍सिन उपलब्ध होईल का, या संदर्भात श्री. पवार यांची भेट घेतली.

हेही वाचा : शेतकऱ्यांना खरीपासाठी तात्काळ कर्ज पुरवठा करणार!

यावर शरद पवार साहेबांनी सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शुक्रवारी (ता. 4) आपल्याला हडपसर येथे भेटायला बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किती व्हॅक्‍सिन वायल उपलब्ध होतात, हे पाहून खंडाळा, महाबळेश्वर व वाई तालुक्‍यांतील लोकांसाठी विशेषतः विविध इंडस्ट्रीमधील कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे आमदार पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

आवश्य वाचा : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या घरी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख