शेतकऱ्यांना खरीपासाठी तात्काळ कर्ज पुरवठा करणार!

कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये याकरीता शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जे शेतकरी कर्जाचे हप्ते व नियमितपणे परतफेड करत असतील, त्यांना बँकांनी खरीपासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Mandhre- Bhujbal
Mandhre- Bhujbal

नाशिक : कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये (Farmers shall not be face problems in Covid19) याकरीता शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जे शेतकरी कर्जाचे हप्ते व नियमितपणे परतफेड करत असतील, त्यांना बँकांनी खरीपासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करावे, (Banks Shall sanction croploan to farmers) असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्जाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विभागीय सहकार सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेला निधी कर्जमाफीसाठीच वापरण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांनी सहकारी संस्थामार्फत घेतलेल्या कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या जमीनींचे लिलाव करण्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असून त्यांना नव्याने कर्ज घ्यायचे आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकाकडून आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यात यावीत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत व सुरळीतपणे कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  

यंदाच्या वर्षात २७०० कोटींच्या कर्ज वाटपाच्या उद्दीष्टापैकी दोन महिन्यात ४४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
...

हेही वाच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com