देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या घरी 

एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली.
Devendra Fadnavis met Raksha Khadse.jpg
Devendra Fadnavis met Raksha Khadse.jpg

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगावातील मुक्ताईनगरच्या  दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचे म्हणजे फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी रक्षा खडसे यांच्याशी जवळपास २० मिनिटे चर्चा केली. (Devendra Fadnavis met Raksha Khadse)

यावेळी भाजप नेते गिरिष महाजन, खासदार उमेश पाटील, आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर ते मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही व वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

जळगाव जिल्ह्यात भाजपची पडझड होत आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या दहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. जळगाव महापालिकेतीन भारतीय जनता पक्षाच्या २९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भाजपला जळगाव महापालिकेती एकहाती सत्ता सोडावी लागली होती. त्यामुळे फडणवीसांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती, फडणवीस यांनी ट्विटरवरून या भेटीची माहिती दिली होती. 'माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली,' असे ट्विट करत फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले होते. पित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन पवार पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हे भेट झाल्याचे बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com