लसीकरणात महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केले यंत्रणेचे कौतूक - Maharashtra leads the country in vaccination; Chief Minister, Health Minister appreciated the system | Politics Marathi News - Sarkarnama

लसीकरणात महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केले यंत्रणेचे कौतूक

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

महाराष्ट्र पाठोपाठ उत्तरप्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक Corona vaccination लस देऊन महाराष्ट्राने Maharashtra देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश Uttar Pradesh आणि गुजरातचा Gujrat क्रमांक लागतो. Maharashtra leads the country in vaccination; Chief Minister, Health Minister appreciated the system

राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकणार यावर पवारांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्र पाठोपाठ उत्तरप्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

आवश्य वाचा : पवार साहेबांनी सूत्रे हलवली अन् मी मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो..

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख