तर मंत्र्यांना फिरू देणार नाही : जयकुमार गोरे

आमदार गोरे म्हणाले, ''राज्य सरकारच्या कारभारामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. अजित पवारांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्‍घाटनाला हजारोंचा समुदाय चालतो. मात्र, आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी समाजाची दडपशाहीने मुस्कटदाबी केली जात आहे.
Maan Khatav taluka BJPs Chakka Jaam andolan
Maan Khatav taluka BJPs Chakka Jaam andolan

दहिवडी : मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण पुनर्स्थापित होत नाही. तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही. मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.Maan Khatav taluka BJPs Chakka Jaam andolan
 
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावे, या मागणीसाठी आज येथील फलटण चौकात आमदार गोरे यांच्या नेतृत्वाखाली माण तालुका भाजप पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते.

या आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिद्धार्थ गुंडगे, राजाराम बोराटे, लिंगराज साखरे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे, काकासाहेब शिंदे, ॲड. दत्तात्रेय हांगे, दिगंबर राजगे, नवनाथ शिंगाडे, आप्पासाहेब पुकळे, रवी काटकर, अजित दडस, सदाशिव सावंत आदी उपस्थित होते. 

आमदार गोरे म्हणाले, ''राज्य सरकारच्या कारभारामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. अजित पवारांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्‍घाटनाला हजारोंचा समुदाय चालतो. मात्र, आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी समाजाची दडपशाहीने मुस्कटदाबी केली जात आहे. सरकार जास्त दिवस हा आवाज दाबू शकणार नाही.'' या वेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. धनगर बांधवांनी ढोल, लेझीमच्या तालावर गजी नृत्य करून आंदोलनात सहभाग नोंदवला. 

पोलिसांनीच केला चक्का जाम.... 

भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी आणि परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दीडशे पोलिस तैनात करण्यात आले होते. म्हसवड, गोंदवले, मार्डी, पिंगळी फाटा, बिदालसह सर्वच बाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर अडथळे लावून वाहने व आंदोलनकर्त्यांना अडविण्यात आले. त्यातच आज संचारबंदी असल्यामुळे आंदोलनस्थळी मोजकेच कार्यकर्ते पोचू शकले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांनीच केला चक्का जाम अशी चर्चा रंगली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com