अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले - NCP workers got angry when ED raided Anil Deshmukh's house | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जून 2021

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन बंगल्यासमोर धडकले. ईडी, मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सिव्हिल लाइन येथील निवासस्थानी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने दुसऱ्यांदा धाड घातली. ईडीने सीआरपीएफच्या सशस्त्र जवानांना सोबत आणले होते. त्यांच्या घराला पोलिसांनी वेढ घातला, तसेच त्यांना अटक करण्यात येणार असल्याच्या अफवेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. (NCP workers got angry when ED raided Anil Deshmukh's house)

दरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन बंगल्यासमोर धडकले. ईडी, मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

बईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतून शंभर कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप केला होता. याविरोधात न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. न्यायालयाने देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, सक्त अंमलबजावणी संचालनालयाची मदत घेतल्या जात आहे.

ईडीने यापूर्वीसुद्धा अनिल देशमुख यांच्या घरी छापे मारून झाडाझडती घेतली होती. देशमुख यांच्याशी संबंधित व्यावसायिकांवरही छापे टाकण्यात आले होते. अद्यापही या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

शुक्रवारी ईडीचे पथक देशमुख यांच्या सिव्हिल लाइन येथील बंगल्यात दाखल झाले. सोबत तीस ते पस्तीस सीआरपीएफचे सशस्त्र जवानही होते. यात महिला जवानांची संख्या अधिक होती. देशमुख यांच्या घराच्या भोवताल ते तैनात झाले होते. हे वृत्त पसरताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच धास्तावले. त्यांनी देशमुखांच्या बंगल्याकडे धाव घेण्यास सुरुवात केली.
 

दंगा नियंत्रण पथकाला पाचारण

पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये, यासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. सहायक पोलीस आयुक्त जाधव आपल्या ताफ्यासह देशमुखांच्या घरासमोर दाखल झाले. त्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल सबनीस, अंबाझरी ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र हिवरे कुमक घेऊन आले. पोलिसांनी आंदोलनकांना ताब्यात घेतले. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ईडीचे पथक परतल्यानंतर वातावरण शांत झाले.
 

हेही वाचा..

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात झारीतील शुक्राचार्य कोण

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख