मनोमिलनावर विसंबून न राहता केली स्वबळाची तयारी : इंद्रजित मोहिते

मागील सत्ताधाऱ्यांनी जी उणीव ठेवली आहे, ती भरून काढायची आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना एकत्रित करून आणून एकसंध राहण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु तो प्रयत्न अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. तोपर्यंत अर्ज भरण्याचा अवधी संपेल म्हणून सर्व अर्ज भरले आहेत.
Indrajith Mohite filed nomination papers for Krishna factory Election
Indrajith Mohite filed nomination papers for Krishna factory Election

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात (Krishna Sugar Factory election) मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. मात्र, काळ इतका पुढे निघून गेला आहे की, अर्ज भरण्याची वेळ निघून जावू नये, म्हणून आम्ही अर्ज भरले आहेत. मनोमिलनावर विसंबुन न राहता स्वबळाचीही तयारी केली आहे. त्यामुळे पूर्ण 21 लोकांची पॅनेल (21 Members Pannel) लढविण्याची तयारी आहे, असे स्पष्ट मत रयत संघर्ष मंचाचे नेते व कृष्णाचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते (Dr. Indrajit Mohite) यांनी व्यक्ते केले. ndrajith Mohite filed nomination papers for Krishna factory Election

रयत संघर्ष मंचाचतर्फे आज कराड येथे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. मोहिते म्हणाले. कृष्णा सहकारी साखर कारखान्यात संस्थापक पॅनेल आणि यशवंतराव मोहिते रयत संघर्ष पॅनेल एकत्रित येण्यासाठी आशावादी आहोत. संपूर्ण 21 लोकांचे पॅनेल लढवणार आहोत. आम्ही नेत्यांचा आग्रहाचा विचार न करता सभासद आणि कारखाना हित लक्षात घेवून मनोमिलाच्या चर्चेत उतरलो आहोत.

त्याच मुद्द्यांवर आम्ही ठाम आहोत. मात्र, आम्ही ठाम आहोत. कारखान्याचे हित बघणारे लोक आमच्या सोबत आहेत. ते सोबत राहतीलही कारखान्याच्या हिताच्या आडवे येतील त्यांना विरोध करून आम्ही पुढे जाणार आहोत. कारखान्याचे हित बघणारी तरूणपिढीही आमच्या सोबत आहे. एक विचाराचे लोक एकत्रित आणत आहोत. एकमेकांच्या विरोधात लढले एकत्र येण्यास बराच वेळ जाणार आहे. मनोमिलनाचा विषय बाजूला ठेवला असे नाही.

ती चर्चा चालू राहिल, आम्ही सकारात्मक आहोत. परंतु शेवट काय निष्पन्न होईल ते सांगता येणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन एकत्रिकरणाच्या बैठका करत आहोत. त्याबाबत आशावादी आहोत. टाळी एका हातांनी वाजत नाही, तर त्यासाठी दोन्ही हातांची गरज असते. कारखाना अधिक लोकाभिमुख, करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मागील सत्ताधाऱ्यांनी जी उणीव ठेवली आहे, ती भरून काढायची आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना एकत्रित करून आणून एकसंध राहण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु तो प्रयत्न अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. तोपर्यंत अर्ज भरण्याचा अवधी संपेल म्हणून सर्व अर्ज भरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com