Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav thackeray
Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav thackeray

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय ठरणार? संभाजीराजे वर्षा निवासस्थानी

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. वर्षा निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीला मंत्री अशोक चव्हाण व राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हेही उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार आणि त्यानंतर पाच वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे कोणती घोषणा करणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav thackeray)

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणावरून त्यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तसेच अप्रत्यक्षपणे भाजपवरही टीका केली होती. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याने मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे. काही नेत्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपनेही पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. संभाजीराजे यांनी मात्र सुरूवातीपासूनच कोरोनामुळे रस्त्यावर न उतरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी निकालानंतर राज्यभरातील मराठा समन्वयकांशी संवाद साधत भूमिका मांडली आहे. तसेच त्यांची मंत जाणून घेतली आहे. 

गुरूवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांची भूमिका जाणून घेतली. तसेच मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन केले. तर आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपली भूमिका राज्यभरातील मराठा समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर जाहीर करू, असे सांगितले होते. 

काही दिवसांपूर्वी सोलापूरात बोलताना संभाजीराजे यांनी राजीनामा देऊन मराठा आरक्षण मिळणार असेल तर मी राजीनामा द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य केलं होतं. आजच्या भेटीगाठींना त्याचाच संदर्भ जोडला जात असला तरी अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळं संभाजीराजें आजच्या भेटीगाठींनंतर काय भूमिका मांडणार याची उत्सुकता आहे. 

दरम्यान, काल शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती शरद पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितलं. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक दृष्टीकोन दाखवला.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com