महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेस नाराज...मंगळवारी समन्वय समितीची बैठक 

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
Mahavikas Aghadi coordination committee meeting on tuesday
Mahavikas Aghadi coordination committee meeting on tuesday

मुंबई : तीन प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने केली जाते. अधूनमधून सरकारमधील कुरबुरी बाहेरही येतात. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते नाराज आहेत. त्यातच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackarey यांनी सरकार टिकविणे ही केवळ शिवसेनेची जबाबदारी नसल्याचेही पवार यांच्या ध्यानात आणून दिल्याचे समजते. (Mahavikas Aghadi coordination committee meeting on tuesday)

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तसेच समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. येत्या मंगळवारी या समितीची बैठक होणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या बैठकीत मतभेदांवर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, कालच्या बैठकीत नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समितीमध्ये चर्चा व्हायला हवी होती, पण तसं काही झालं नाही. तिघांच्या समन्वय समितीमध्ये एकत्रित बसून यावर चर्चा केली जाईल. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमतीमध्ये निर्णय व्हायला हवा होता. चर्चा न झाल्याने नाराजी होती. 

चक्रीवादळात नुकसान झालेले नागरिक व शेतकऱ्यांना मदत देण्यावरून भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर बोलताना थोरात यांनी भाजपला टोला लगावला. ते म्हणाले, चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून गुजरातला गेलं. पंतप्रधान मोदी गुजरातला जाऊन एक हजार कोटी रुपयांची मदत करतात. पण महाराष्ट्राला काही दिलं नाही. विरोधकांनी टीका न करता दिल्लीत जाऊन राज्याच्या मदतीसाठी आग्रह धरायला हवा. 

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी, अशा मंत्रिमंडळातील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने राज्यात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकविणे ही केवळ शिवसेनेची जबाबदारी नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांच्या ध्यानात आणून दिल्याचे समजते.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com