रासायनिक खतांची दर वाढ त्वरित मागे घ्या : खासदार रक्षा खडसेंचा केंद्राला घरचा आहेर
Immediate reversal of price hike of chemical fertilizers: MP Raksha Khadse

रासायनिक खतांची दर वाढ त्वरित मागे घ्या : खासदार रक्षा खडसेंचा केंद्राला घरचा आहेर

रासायनिक खताची ह्या वेळेस केलेल्या भाववाढ ही पूर्णतः मागे घ्यावी व कोविड महामारीच्या या देशात आलेल्या विपरीत परिस्थिती जोपर्यंत सामान्य होत नाही, तो पर्यंत अशी कुधालीही रासायनिक व मिश्रखते यांची भाववाढ होऊ नये. यासाठी लागणारी उपाय योजना करावी जेणे करून शेतकऱ्यांवर कुठलाही नवीन भार पडणार नाही.

जळगाव : रासायनिक खते विशेषतः मिश्र खते यांची मागील वर्षीच्या किमंतीपेक्षा अंदाजे ४०० ते ८०० रूपये प्रती गोणी इतकी भाववाढ झाल्याचे मागील काही दिवसांपासून कानावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांची चिंता स्पष्ट दिसत होती. त्यामुळे रासायनिक खते विशेषतः मिश्र खते यांची दर वाढ त्वरित मागे घेऊन खतांच्या भावावर नियंत्रण आणावे, अशी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) केंद्रीय रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा (Sadanand Gauda) यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे. (Immediate reversal of price hike of chemical fertilizers: MP Raksha Khadse)

याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात मुख्यता केळी हे पीक घेतले जाते व केळीसाठी मोठ्या प्रमाणात मिश्र खतांचा वापर जळगाव जिल्ह्यातून होत असतो. तसेच जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी कापूस, ज्वारी, मका मुंग उडीद व सोयाबीन ह्या पिकांसाठीही आता शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते ह्या वेळेस विकत घेत असतो अशा ऐन पेरणीच्या वेळी ही भाववाढ म्हणजे शेतकऱ्यांची तारांबळ उडविणारी आहे.

जळगाव जिल्ह्यात ह्या भाववाढीमुळे अंदाजे १०० ते १२५ कोटींचा वाढीव ताण हा शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. हल्लीच्या परिस्थिती मध्ये बाजारामध्ये युरीयाची मोठ्या प्रमाणात तुट आतच जाणवत आहे. जे एक गरजेचे आणि सर्व शेती पिकांसाठी लागणारे खत आहे. युरिया बाजारामध्ये उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा शेतकरी बांधवाना त्या ऐवजी मिश्रखते जी खुप महाग आहेत, ती वापरावी लागत आहे. जी आजच्या नवीन भाव वाढीमुळे शेतकऱ्याला परवडणारी नाहीत.

हेही वाचा : युवकांच्या हृदयातील नेता गमावला; काँग्रेसची न भरून येणारी हानी....
 
कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटे दरम्यान व मागील वर्षापासून सुरु असलेली ही महामारी आता वेगाने पसरत आहे व त्यामुळे शेतकरी आधीच विपरीत परिस्थितीशी सामना करत आहे. त्यामध्ये मागील वर्षात पिकलेले धान्य व इतर शेती पिकांना योग्य असा भाव पण मिळाला नसल्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता ह्या नवीन खरीप हंगामासाठी शेती कामाचे नियोजन करतांना गोंधळात आहे.

त्यामध्येच खताची ही भाववाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिन्यासारखे आहे. रासायनिक व उर्वरक मंत्री केंद्र सरकार यांना खासदार रक्षा खडसे यांनी विनंती करत रासायनिक खताची ह्या वेळेस केलेल्या भाववाढ ही पूर्णतः मागे घ्यावी व कोविड महामारीच्या या देशात आलेल्या विपरीत परिस्थिती जोपर्यंत सामान्य होत नाही, तो पर्यंत अशी कुधालीही रासायनिक व मिश्रखते यांची भाववाढ होऊ नये. यासाठी लागणारी उपाय योजना करावी जेणे करून शेतकऱ्यांवर कुठलाही नवीन भार पडणार नाही.

शेतकरी बांधव ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शेती पिके उपलब्ध करून देईल म्हणून माझी केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे, की सध्या तरी रासायनिक व मिश्रखते यांची भाववाढ हि पूर्णतः मागे घ्यावी. मागील वर्षी असलेल्या किमंती मध्येच शेतकऱ्यांना राज्याच्या केलेल्या मागणीनुसार वेळेवर साठा उपलब्ध करून द्यावा ही अशी विनंती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर व रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी पत्राद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in