युवकांच्या हृदयातील नेता गमावला; काँग्रेसची न भरून येणारी हानी.... 

युवक काँग्रेसच्या कारकिर्दीत त्यांनी युवा नेत्यांचा मोठा परिवार उभा केला. त्यातून ते काँग्रेसची ताकद उभी करीत होते. काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता. राहुल गांधी यांनी काँग्रेसची पुनर्रचना करताना युवक काँग्रेसमध्ये कामगिरी बजावलेल्यांना संधी दिली.
Lost the leader in the hearts of the youth; Irreparable loss to Congress Says Prithviraj Chavan
Lost the leader in the hearts of the youth; Irreparable loss to Congress Says Prithviraj Chavan

कऱ्हाड : कोविडमुळे काँग्रेसमधील (Congress) राष्ट्रीय पातळीवरील आम्ही दुसरा नेता गमावला आहे. यापूर्वी अहमद पटेल (Ahamad Patel) यांना गमावले. आता तरुण, तडफदार खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे निधन झाले. खासदार सातव म्हणजे युवकांच्या हृदयातील नेता आम्हाला गमवावा लागला आहे. ती हानी न भरून येणारी आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खासदार सातव यांना श्रद्धांजली वाहिली. (Lost the leader in the hearts of the youth; Irreparable loss to Congress Says Prithviraj Chavan)
 
श्री. चव्हाण म्हणाले," अत्यंत कमी वयात सातव यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते खासदार होण्यापर्यंतचा राजकीय प्रवास झाला आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. स्वाभाविकपणे देशातील तरुण, होतकरू नेता म्हणून त्यांची ख्याती झाली.

.काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून अनेक राज्यांची जबाबदारी त्यांनी पेलली होती. गुजरातचे प्रभारी या नात्याने नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोलाची कामगिरी करत गुजरातमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. त्यांची पक्षाच्या संघटनात्मक कामाची पद्धत आणि तळमळ अभिमानास्पद अशी होती.''

युवक काँग्रेसच्या कारकिर्दीत त्यांनी युवा नेत्यांचा मोठा परिवार उभा केला. त्यातून ते काँग्रेसची ताकद उभी करीत होते. काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता. राहुल गांधी यांनी काँग्रेसची पुनर्रचना करताना युवक काँग्रेसमध्ये कामगिरी बजावलेल्यांना संधी दिली. त्यामधील खासदार सातव आहेत. दिल्लीला खासदार म्हणून गेल्यानंतर राज्यातील राजकारणाबाबत ते थोडेसे अलिप्त राहिले.

परंतु, महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांची बारीक नजर असायची. अनेक नेते त्यांना दिल्लीला जाऊन महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत माहिती देत असत. सातव यांचे संसदेमधील कार्य उत्तम होते. खरंतर त्यांनी स्वतःला संघटनेच्या कामासाठी वाहून घेतले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे तसेच अखिल भारतीय काँग्रेसचे फार मोठे नुकसान झालेले आहे, असे चव्हाण म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com